Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

🔴आठ बँकांना ४३०० कोटींचा गंडा; सीबीआयने दाखल केला गुन्हा

 हैदराबादमधील एका कंपनीने आठ सार्वजनिक बँकांची ४८३७ कोटींची फसवणूक केली आहे. सीबीआयने याप्रकरणी कंपनीविरोधात आणि काही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


 स्टेट बँक ऑफ इंडियाने केलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने आयव्हीआरएसएल (IVRCL) कंपनी, व्यवस्थापकीय संचालक ई सुधीर रेड्डी, सह-व्यवस्थापकीय संचालक आर बलरामी रेड्डी, काही सरकारी कर्मचारी आणि अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आयव्हीआरएसएल लिमिटेड ही इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी असून गेल्या २५ वर्षांपासून पाणी आणि पर्यावरण, सिंचन, वाहतूक, इमारती आणि औद्योगिक संरचना, वीज वितरण आणि प्रसारण, ऑपरेशन्स आणि देखभाल आणि खाणकाम क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, आरोपींनी अज्ञात सरकारी कर्मचाऱ्यांसोबत मिळून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची फसवणूक केली आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, कॅनरा बँक, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक, इक्सएआयएम बँक, पंजाब अॅण्ड सिंध बँक, युनिअन बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. या सर्व बँकांना ४८३७ कोटींची फसवणूक झाली आहे. सीबीआयचे प्रवक्ते आर जी कौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरोपांनुसार कर्जदार कंपनीच्या संचालकांनी असून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वातील बँकांकडून क्रे़डिट लिमिटचा लाभ घेतला आणि कर्जाची परतफेड न करता फसवणूक केली”. तक्रारीत दाखल माहितीनुसार, कंपनीने लेटर ऑफ क्रेडिट्सच्या (LCs) माध्यमातून संबंधित लोकांना पैसे दिले. यावेळी त्यांनी खरेदी व्यवहारांची नोंद न करता कंपनीच्या खात्यात हा निधी जमा केला आणि बँकेच्या निधीचा गैरवापर केला. सीबीआयकडून बुधवारी यासंबंधी आरोपींच्या कार्यालयं आणि घरांवर टाकून काही कागदपत्रं जप्त केली आहेत.

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment