Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीसाठी येताना खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना करण्यात येत आहेत.

 1.दिव्यांग तपासणीसाठी येताना फक्त  1 नातेवाईकांस  प्रवेश देण्यात येईल. कोव्हिड 19 बाधित रुग्ण संख्येचा विचार करता प्रत्येक दिव्यांगाने स्वतःच्या आरोग्य सुरक्षेस प्राधान्य देऊन अत्यावश्यक असलेसच प्रवास करावा.

2.तपासनीस येणे पूर्वी आपणास सोबतच्या नातेवाईकास कोव्हिड सदृश्य आजार नसल्याची खात्री करावी नाक व तोंड पूर्ण झाकेल असा मास्क व सुरक्षित अंतर सर्वाना बंधनकारक आहे.
3.सर्व दिव्यांग व सोबतच्या नातेवाईकांची कोव्हिड सदृश्य लक्षणांची तपासणी झाल्यावरच अंतिम दाखल्यासाठी प्रवेश मिळेल.
4.दिव्यांग तपासणी शासकीय कामाचे दिवशी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शुक्रवारी दिव्यांग विभाग जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे करण्यात येईल.दर बुधवारी फक्त 5 कर्णबधिर व फक्त 5 दृष्टिदोष , 10 अस्थिव्यंग दिव्यांगांची तपासणी होईल. दर शुक्रवारी फक्त 5 दृष्टिदोष व 5 कर्णबधिर,10 मानसिक (मतिमंद) व 10 बहुविकलांग दिव्यांगांची तपासणी होईल.
5. कर्णबधीर रुग्णांना आवश्यक बेरा (BERA) चाचणी जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहे.
6.दिव्यांगांनी तपासनीस येण्यापूर्वी आपल्या दिव्यांगतवानुसार खालील क्रमांकावर अपॉईंमेंट घेऊनच यावे प्रत्येक दिव्यांगत्वानुसार फक्त 10 रुग्णांना प्रवेश मिळेल.
7.दर बुधवार कर्णबधिर दृष्टिदोष अस्थिव्यंग दिव्यांग यांच्या अपॉइंटमेंट साठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 हेल्प डेस्क क्रमांक 02352226060 यावर संपर्क साधावा.
दर शुक्रवारी दृष्टिदोष ,कर्णबधिर ,मानसिक मतिमंद ,बहुविकलांग दिव्यांग अँपॉईंमेंट साठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 हेल्प डेस्क क्रमांक 02352226060 यावर संपर्क साधावा.
अँपॉईंमेंट न घेता आल्यास कोणाचीही तपासणी होणार नाही.
8.दिव्यांगांनी तपासनीस येण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करून त्याची प्रिंट आऊट , आधार कार्ड व रेशन कार्ड यांची झेरॉक्स घेऊन यावे हे आवश्यक आहे.त्याच बरोबर जर जुने दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर त्याची मूळ प्रत घेऊन यावी.हॉस्पिटल मधून डिस्चार्ज दिल्यानंतर मिळणारे डिस्चार्ज कार्ड, आजाराची सर्व कागदपत्रे , उपचारांची फाईल, एक्सरे रिपोर्ट्स  आणणे आवश्यक आहे.
9.जर शासकीय नोकरीत असेल तर सक्रिय नोकरीत असले संबंधीचे विभाग प्रमुखाचे दिव्यांग  तापसणीसाठीचे पत्र सोबत आणणे आवश्यक आहे .
10.अधिक माहितीसाठी दिव्यांग विभागातील भौतिकउपचार तज्ञ श्री .नितीन चौके व अमित वायगंणकर यांचेशी वैयक्तिक संपर्क साधावा.www.swavlambancard.gov.in या प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करावा.
अपॉईंमेंट पद्धतीने तपासणीची सुरवात दिनांक 1 जानेवारी 2021पासून  होईल. याची नोंद घ्यावी
             जिल्हा शल्य चिकित्सक  ,  जिल्हा  शासकीय रुग्णालय रत्नागिरी
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment