Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

कर्तव्यदक्ष अधिका-यांच्या जीवनावर आधारित ऑफिसर कृष्णा" हा लघुचित्रपट रिलीज!

 


 कोल्हापूर: माणसाने परिस्थितीशी सामना करीत जिद्द चिकाटी आणि मेहनत याला अंगीकारले तर निश्चित यश संपादन करता येते तसाच तो समाजासाठीही आदर्श बनतो याचेच उदाहरण म्हणजे इस्लामपूर विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी मा. कृष्णात पिंगळे ...घरची परिस्थिती बिकट ,वडील व्यसनी , आई मोलमजुरी करीत मुलांचे संगोपन करणारी ,त्यातूनही कष्ट उपशीत , कृष्णात पिंगळे यांनी आपले शिक्षण पूर्ण करून एक शिक्षक ते महाराष्ट्र पोलीस अधिकारी बनले . समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अंगावर वर्दी घातली . अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या संघर्षमय जीवनावर इचलकरंजीतील संगीत नाट्य कला क्षेत्रातील नावाजलेली व्यक्ती म्हणजे चंद्रकांत जगताप यांनी शिवानी फिल्म प्रोडक्शन आणि जयचंद्र प्रोडक्शन च्या माध्यमातून शक्तीचंद माछरेकर यांच्यासमवेत या लघु चित्रपटाची निर्मिती केली . या लघु चित्रपटाचे प्रदर्शन इचलकरंजी येथील वातानुकूलित राधाकृष्ण चित्रपट ग्रहात गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अधिकारी , माननीय जयश्रीताई गायकवाड . यांच्या हस्ते गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार , इस्लामपूर चे विभागीय पोलीस अधिकारी आणि ज्यांच्या जीवनावर आधारित हा लघुपट बनवला गेला ते , कृष्णात पिंगळे व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला . हा चित्रपट अत्यंत सुंदर, हृदयस्पर्शी असा आहे . या लघु चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी इचलकरंजी आणि परिसरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती . संपूर्ण चित्रपट ग्रह गर्दीने भरलेले होते . 


                                पिंगळे यांच्या वडिलांच्या भूमिकेत कथा-पटकथा-संवाद संगीतकार आणि दिग्दर्शक यांनी निभावली तर त्यांच्या आईच्या भूमिकेत कविता चव्हाण , मामा बजरंग कांबळे ,तसेच शक्तीचंद माछरेकर ,अथर्व गणमुखी , वरद मंलके ,जीवन कुरणे , बाबासाहेब कत्ते , अमोल भोजने,  ओमकार भाट , दीपा पुजारी , आदी कलाकार होते , हा चित्रपट यु ट्यूब वरती लवकरच पहावयास मिळेल असे या चित्रपटाचे निर्माते शक्तीचंद माछरेकर यांनी सांगितले .सर्व कलाकारांना यावेळी सन्मानचिन्ह बहाल करण्यात आले . या कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची जबाबदारी अरुण दळवी यांनी सांभाळली .


दैनिक फ्रेश न्यूज 
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................

फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील पत्रकार आणि जाहिराती साठी कोल्हापूर ऑफिसला संपर्क  साधा :9529501121/9529880144
                                      कोल्हापूर : freshnewskop24@gmail.com
C.S.No.1002, Flat No.4, Second Floor, Sushani Nivas, Bihind Khadi kapad Udyog, Khasbag Kolhapur.
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment