Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

"राष्ट्रप्रेमी रिक्षा संघटनेचे शिमगा" 'निदर्शने आंदोलने'

 

 

राष्ट्रप्रेमी रिक्षा संघटना कोल्हापूरच्या वतीने "शिंमगा व बोंबाबोंब" आंदोलन

कोल्हापूर:राष्ट्रप्रेमी रिक्षा संघटना कोल्हापूर च्या वतीने दिनांक 5 फेब्रुवारी रोजी माननीय जिल्हाधिकारी देसाई साहेब यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कोरोना महाभयंकर संकट आणि मंदावलेला रिक्षा व्यवसाय व सद्य विदारक परिस्थिती, गगनाला भिडलेली महागाई यामुळे रिक्षाचालक हतलब, दिशाहीन तसेच आर्थिक अरिष्ट मध्ये सापडला आहे. फसलेली शाश्वत उत्पन्न व भविष्याचा आधार नसलेल्या रिक्षाचालकांचा कोणीच वाली नसून, शासनाच्या दुर्लक्षामुळे मापक व मर्यादित गरजा माफक व मर्यादित गरजा असणाऱ्या रिक्षाचालकांचा कायमचा "शिमगा आणि बोंबाबोंब" हाच सण उरला आहे. अशी भावना यावेळी फ्रेश न्यूज च्या प्रतिनिधीशी बोलताना, संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. यावेळी त्यांनी रिक्षाचालकांना माणुसकी म्हणून न्याय व उभारी तसेच नवंसंजीवनाचा हक्क देण्यासाठी, पुढील मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 01).सप्टेंबर 2020 पर्यंतची वीजबिले पूर्ण माप करून, उर्वरित वीज बिलामध्ये सवलत आणि टप्पे द्यावेत.  2). निदान तीन वर्ष पेट्रोल दर स्थिर ठेवून दर कमी करावेत. 03).अजूनही ऊन वारा पाऊस याची तमा न करता आजारपणा मध्येही राबणाऱ्या काही रिक्षाचालकांना स्वतःचा निवारा नाही, अशा सर्व भाडेकरू रिक्षाचालकांना स्वतःची घरे मोफत मिळावीत.

                                                  अशा मागण्यांचे निवेदन देऊन, पंधरा दिवसात यावर सकारात्मक विचार करून मागण्या मान्य कराव्या.  अन्यथा विविध मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा राष्ट्रप्रेमी रिक्षा संघटनेच्या वतीने देण्यात आला. यावेळी संघटनेचे मार्गदर्शक शरद सोनुले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मारुती पवार, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय बोंद्रे, दुर्गा पवार, अंजुम शेख, संजय दनाने, सुनील माळी, शशिकांत निंबाळकर तसेच आर आर राजपूत आदी रिक्षाचालक उपस्थित होते.दैनिक फ्रेश न्यूज 
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................

फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील पत्रकार आणि जाहिराती साठी कोल्हापूर ऑफिसला संपर्क  साधा :9529501121/9529880144
                                      कोल्हापूर : freshnewskop24@gmail.com
C.S.No.1002, Flat No.4, Second Floor, Sushani Nivas, Bihind Khadi kapad Udyog, Khasbag Kolhapur.
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment