Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

*बनावट पासपोर्ट भारतातून लंडन येथे नोकरीनिमित्त जाण्या-येण्यासाठी वापर केल्याप्रकरणी दाभोळ पोलिस स्थानकात एकावर गुन्हा दाखल*

*बनावट पासपोर्ट भारतातून लंडन येथे नोकरीनिमित्त जाण्या-येण्यासाठी वापर केल्याप्रकरणी दाभोळ पोलिस स्थानकात एकावर गुन्हा दाखल*



रत्नागिरी प्रतिनिधी:-

बनावट पासपोर्टचा भारतातून लंडन येथे नोकरीनिमित्त जाण्या-येण्यासाठी वापर केल्याप्रकरणी दापोली तालुक्यातील दाभोळ पोलिस स्थानकात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिनांक २८/०४/२०११ ते दिनांक ११/०३/२०२१ पर्यंत या कालावधीत दापोली तालुक्यातील चिखलगाव ते लंडन या दरम्यान घडला आहे. 

यातील आरोपीत सदानंद गणपत चाफे रा.चिखलगाव ता.दापोली या नावाने प्राप्त असलेल्या पारपत्र क्र.झेड २११५५६ या क्रमाकाचे लंडन येथुन दि.०८/ ०४/२०११ रोजी निर्गमित झालेल्या पारपत्राची नुतनीकरणाच्यावेळी प्राप्त असलेल्या फाईल क्र.युके २०७४३२७७६३५२० दि.२८/ १०/२०२० या अर्जाच्या केलेल्या चौकशीच्या दरम्याने प्राप्त कागदपत्रावरुन पारपत्रधारक सुधीर गुणाजी चाफेकर रा.चिखलगाव रत्नागिरी याने त्याचे खरे नाव सदानंद गणपत चाफे असे असताना त्याने सुधीर गुणाजी चाफेकर या बनावट नावाने पारपत्र लंडन येथुन प्राप्त करुन घेवुन त्या पारपत्रावरील नाव बनावट असल्याचे त्यास माहित असताना देखील त्याने स्वतःच्या फायद्याकरीता कपटीपणाने अप्रामाणिकपणाने खरा असल्याचे वापरात आणुन त्याद्वारे दि .८/ ४/ २०११ ते आजपावेतो भारतातुन लंडन परदेशात नोकरीनिमीत्त जाणे-येणेस प्रवासाकरीता वापर केलेला असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा नोंद करण्यात आला. यासंदर्भात दाभोळ पोलिस स्थानकात गुन्हा रजिस्टर नंबर ४/२०२१, भा.दं.वि. कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ व इंडियन पासपोर्ट कायदा १९६७ कलम १२(१)(बी) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद पोलिस शिपाई सिद्धार्थ माधवराव गायकवाड यांनी दिली आहे. 



 ........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121




Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा