Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

*ग्रामसेवकावर करण्यात आली प्रशासकीय कारवाई*

 *कुवारबाव ग्रामपंचायत सरपंचांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर*




कुवारबाव ग्रामपंचायतीत एमआरपी पेक्षा जास्त दराने क्रीडासाहित्याची खरेदी?
ग्रामसेवकावर करण्यात आली प्रशासकीय कारवाई


रत्नागिरी प्रतिनिधी:-

कुवारबाव ग्रामपंचायतीमध्ये 14 व्या वित्त आयोगातील 2019-20 मधील क्रीडा साहित्य पुरवठा व्यवहारात आर्थिक अपहार झाल्याचा आरोप कुवारबाव उपसरपंचांसह दहा सदस्यांनी केला आहे़. खरेदी केलेल्या क्रीडा साहित्यांच्या सामानाची एमआरपी आणि बीलावरची रक्कम यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याने ग्रामपंचायतीमधील सदस्य आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात रत्नागिरी पंचायत समितीकडे सादर केलेल्या तक्रार अर्जानुसार चौकशी करण्यात आली. चौकशीअंती वस्तूस्थिती निदर्शनास आल्याने कुवारबाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३) कलम ३९(१) अन्वये सरपंचांवर अपात्रतेशी कारवाई करण्याच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे रत्नागिरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.  

कुवारबाव ग्रामपंचायतीच्या सरपंच मंजिरी पाडळकर यांच्यावर ग्रामपंचायत सदस्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत़. चौदाव्या वित्त आयोगातील खरेदी केलेल्या क्रीडा साहित्याच्या अवाजवी किंमती लावण्यात आल्या़. क्रीडा साहित्याची बाजारातील किंमत आणि ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या साहित्याची किंमत यामध्ये जमीनआस्मानाचा फरक आढळून आला़. ग्रामपंचायतीने खरेदी केलेले हे साहित्य शाळांना पुरवले़. ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन कोतवडेकर, सदस्य जीवन कोळवणकर, साक्षी भुते, चेतन सावंत, नरेश विलणकर, स्नेहल वैशंपायन, वैदेही दुधवडकर, सुनिला नलावडे, रंजना विलणकर, रिया सागवेकर, रमेश चिकोडीकर यांनी आपल्या स्वाक्षरीचे पत्र जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे़. या पत्रातून त्यांनी कुवारबाव ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या क्रीडा साहित्याच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची आणि कारवाईची मागणी केली आहे़. या पत्रामध्ये त्यांनी पाच मुददे मांडले असून त्यामध्ये खरेदी केलेल्या सामानाची किंमत आणि बिलावरील रक्कम यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याचे नमुद करण्यात आले आहे़. स्थानिक युवा मंडळ अस्तित्वात नसताना सामान खरेदी केले गेले़. चौकशी दरम्यान स्थानिक युवा मंडळांचा जबाब घेण्यात आलेला नाही़. ठराविक अंतराने जीएसटी विरहित बिले प्रथम देण्यात आली़. त्यानंतर 23 नोव्हेंबर 2020 रोजी जीएसटी सहित बिले सादर करण्यात आली़. या विषयाचा ग्रामपंचायतीने बहुमताने मंजूर केलेला ठराव इतिवृत्तामध्येही नमूद करण्यात आला नसल्याचा गौप्यस्फोट उपसरपंच सचिन कोतवडेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे़. ग्रामनिधीचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत कागदपत्रांमध्ये अदलाबदल करणे, फेरफार करणे असे प्रकार विद्यमान सरपंच आणि ग्रामसेवकाकडून घडले आहेत़. व भविष्यातही घडू शकतात़. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत विद्यमान सरपंच व सचिव यांना ग्रामपंचायत कुवारबाव येथील कार्यालयात दस्तऐवज व आर्थिक व्यवहारामध्ये कोणत्याही प्रकारचे हस्तक्षेप अथवा फेरफार करता येणार नाहीत असे आदेश देण्यात यावेत अशी मागणी उपसरपंच सचिन कोतवडेकर आणि दहा सदस्यांनी केली आहे़. 


........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा