Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

दांडे अणसुरे येथे दुचाकिस्वाराने ५९ वर्षिय वृद्धाला ठोकर दिल्याने वृद्ध गंभीर जखमी.

 दांडे अणसुरे येथे दुचाकिस्वाराने ५९ वर्षिय वृद्धाला ठोकर दिल्याने वृद्ध गंभीर जखमी,

 ग्रामस्थांनी केले मदतकार्य




रत्नागिरी प्रतिनिधी:-

देवगड ते रत्नागिरी या दरम्यान दुचाकी चालवत असलेल्या दुचाकिस्वाराने राजापूरातील दांडे अणसुरे येथील पायी चालत असलेल्या ५९ वर्षिय वृद्धाला गाडी हयगयीने चालवून ठोकर दिल्याने तो वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी ६ मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. हा अपघात झाल्याचे समजताच माजी उपसभापती प्रशांत गावकर, युवासेना युवा अधिकारी प्रविण गावकर, अन्य ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी पोचले. दांडे अणसुरे प्रदिप भगवान मयेकर(५९) हे या अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी स्वरित रुग्णवाहिका बोलावण्यात आली. त्यांना तात्काळ जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात, त्यानंतर धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात व त्यानंतर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. अणसुरे येथे अपघात झाल्यानंतर ग्रामस्थ तात्काळ मदतीला धावून गेले. यामध्ये अणसुरे तंटा मुक्ती अध्यक्ष किशोर पंगेरकर, श्रुती गोलतकर, प्रतीक पंगेरकर, गणेश गावकर, शिवाजी मयेकर, माजी सरपंच शीतल पंगेरकर, अणसुरे पोलीस पाटील महेश रसाळ, मिठगवाणे पोलीस पाटील गजानन भोगले, पंकज पंगेरकर, सम्राट पाटील, नाटे येथील ऍम्ब्युलन्स मालक संदेश पाथरे आदी तात्काळ घटनास्थळी पोचले व मदतकार्य केले. या अपघाताबाबत चरण सुभाष हरचकर, रा.पुर्णगड, रत्नागिरी याच्यावर नाटे पोलिस स्थानकात गुन्हा रजिस्टर नंबर १७/२०२१ मध्ये भा.दं. वि. कलम २७९, ३३७, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 




.........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment