Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

वीज तोडणी करून महाराष्ट्रातील तमाम जनतेची फसवणूक करणा-या व MPSC परीक्षा पुढे ढकलून लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान करणा-या लबाड महाविकास आघाडीचा भाजपाच्यावतीने तीव्र निषेध.


या दोन्ही विषयात न्याय मिळत नाही तोपर्यंत सातत्याने जनतेच्या व MPSC परीक्षार्थी विद्यार्थ्यां सोबत राहणार – राहूल चिकोडे 

कोल्हापूर दि.१२ महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) १४ मार्च २०२१ रोजी घेण्यात येणारी परीक्षा अचानक पुढे ढकलली. या पद्धतीच्या घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट येऊन काल संपूर्ण महाराष्ट्रात याचे प्रतिसाद उमटले. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयामुळे सुरु वीज बिल कनेक्शनची सुरु असलेली तोडणी याच्या निषेधार्थ आज भाजपा कोल्हापूरच्यावतीने जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे रास्ता रोको करून तीव्र निदर्शने करण्यात आली. 

                                                                                                   (छाया - तय्यब अली)


काल स्पर्धा परीक्षेची तारीख पुढे ढकलली असे समजताच विद्यार्थांमध्ये रोश पहायला मिळाला. या परीक्षेस संपूर्ण महाराष्ट्रातून साधारण ६ लाख विद्यार्थी बसले आहेत. विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाण्याच्या मार्गावर असताना ऐन वेळेस ही परीक्षा सहाव्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा पुढे गेल्यानंतर सर्व विद्यार्थी नाउमेद झाले आहेत. काही विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपण्याची अडचणही विद्यार्थ्यांसमोर आहे. 

विद्यार्थ्यांच्या या गंभीर प्रश्नाबाबत आज भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली. भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र येऊन यावेळी रास्ता रोको करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. MPSC परिक्षांर्थी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणा-या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो, वीज कनेक्शत तोडण्यास येणाऱ्या निर्लज्ज महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो, महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयशून्य कारभारामुळे चाललाय आमच्या भविष्याचा नुसता खेळ ! ताळमेळ बसेना परीक्षाचा घोळ सुटेना ! महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा आणि निषेधाचे फलक दाखवण्यात आले. 

MPSC परीक्षार्थी संदेश हजारे, विशाल पाटील यांनी शासनाच्या अंतर्गत असणाऱ्या मतभेदामुळे आमच्या सारख्या विद्यार्थ्यांवर अन्याय आणि आमचे भविष्य अंधारात लोटत असल्याची खंत व्यक्त केली. 

जिल्हा सरचिटणीस विजय जाधव यांनी, ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने शहरांमध्ये येऊन अभ्यासाची तयारी करीत असतात. अभ्यास आणि काम असा पर्याय निवडून मिळणाऱ्या पैशातून महिना खर्च भागवून अभ्यास आणि अधिकारी होण्याची जिद्द असल्यामुळे तीघाडी सरकारच्या माध्यमातून परिक्षांच्या सरकारी तारखा देण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पोरखेळ सुरु असल्याचे या घटनेचा तीव्र निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.  

जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये यांनी या सरकारचा मनमानी कारभार सुरु असल्याचे सांगितले. वीज बिल आणि परिक्षांचा तारखा बदल करणारे सरकार हे घूमजाओ सरकार असल्याचे सांगितले. 

संघटन सरचिटणीस अशोक देसाई यांनी, आघाडी सरकार प्रत्यके चांगल्या आणि लोकहिताच्या गोष्टी केवळ कोरोनाचे नाव घेऊन वेळ मारून नेत असल्याचे त्यांनी सांगितले. वीज तोडणीसाठी महिला कर्मचारी यांना पाठवून महिलांना ढाल करून लोकांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला सोयीस्कर फसवत असल्याचे सांगितले. 

पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने गेल्या १३ महिन्या मध्ये अनेक चुकीचे निर्णय घेतले अनेक घोटाळे केले. भारतीय जनता पार्टी MPSC स्पर्धा परिक्षांबाबत सुरु असलेल्या या अनिश्चित व्यवस्थेविरोधात विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम उभी आहे. नियोजित परीक्षा का पुढे ढकलण्यात आली याची कारण मीमांसा सरकारने द्यावी, MPSC आयोगाने ही परीक्षा घ्यायची तयारी दाखवली असताना हा परीक्षा स्थगितीचा निर्णय कोणाचा ? वडेट्टीवारांसारखे जबाबदार मंत्री परीक्षा पुढे ढकलल्याचे मला माहित नाही असे म्हणतात या अर्थी महाविकास आघाडीचा प्रशासनावर वचक नाही. अशा पद्धतीचा मोठा घोळ कोणाच्या चुकीमुळे किंवा निर्णयामुळे झाला याची चौकशी झाली पाहिजे. त्याचबरोबर आठ दिवसांत परीक्षा झाली नाही तर भारतीय जनता पार्टी सर्व एमपीएससी विद्यार्थ्यां सोबत उभी राहून तीव्र लढा उभारून जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत आंदोलन करेल तसेच परीक्षा पुढे गेल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपल्यामुळे ब-याच विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे ते होऊ नये म्हणून सरकारने दोन वर्षे MPSC परीक्षार्थी विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढवावी, पुढे गेलेल्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे परिक्षांसाठी झालेला विद्यार्थ्यांचा खर्च सरकारने करावा. या प्रश्ना संदर्भात भारतीय जनता पार्टी सातत्याने विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहणार आहे. 

त्याचबरोबर अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात संबंधित मंत्री महोदयांनी विज बिल माफी व वीज कनेक्शन तोडणार नाही असे निवेदन केले होते. पण अधिवेशन संपताच विज तोडणीसाठी महावितरण कंपनीला लगेच वीज तोडणीच्या सूचना दिल्या ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे अशा या दोन्ही घटनांनी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील जनतेची, एमपीएससी च्या विद्यार्थ्यांची घोर फसवणूक व त्यांच्यावर अन्याय केला आहे तो दूर होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी स्वस्त बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातील निर्णयशून्य महाविकास आघाडी विरोधात सामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून लढा देऊन जनतेला यातून बाहेर काढेल.  

यानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये जिल्हाधिकारी यांना भेटून प्रत्यक्ष निवेदन सादर करण्यात आले. 

यावेळी जिल्हा सरचिटणीस दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, संतोष भिवटे, विजय आगरवाल, राजू मोरे, सचिन तोडकर, जिल्हा चिटणीस प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, अजित ठाणेकर, मंडल अध्यक्ष संतोष माळी, आशिष कपडेकर, मामा कोळवणकर, विशाल शिराळकर, अमर साठे, नरेंद्र पाटील, सचिन सुतार, सचिन जाधव, रविंद्र घाटगे, अक्षय निरोखेकर, भगवानराव काटे, पृथ्वीराज जाधव, अतुल चव्हाण, विराज चिखलीकर, सचिन साळोखे, अमर पवार, सुमित पाटील, कृष्णा आतवाडकर, प्रथमेश पाटील, आकाश दळवी, सिद्धेश्वर पिसे, प्रमोद पाटील, ओंकार खराडे, धीरज पाटील, संजय जासूद, विजय पाटील, प्रसाद मोहिते, शैलेश जाधव, कालिदास बोरकर, इक्बाल हकीम, मानसिंग पाटील, बापू राणे, दिलीप बोंद्रे, तानाजी निकम, गौरव सातपुते, दिनेश पसारे, विजय गायकवाड, सुनील पाटील, रोहित कारंडे, महेश यादव, महादेव बिरंजे, किशोर लाड, अप्पा लाड, वल्लभ देसाई, निरंजन घाटगे, रहीम सनदी, सिद्धांत भेंडवडे, पुष्कर श्रीखंडे, गिरीष साळोखे, निलेश आजगावकर, राहुल लायकर, आनंद मिठारी, श्रीकांत पाटील, संभाजी रणदिवे, भिकाजी मंडलिक, महादेव मंडलिक, मिसाळ अर्जुन, सुधाकर मातुगडे, आनंद ढेंगे, चंद्रकांत ओतारी, दाजी पठाडे, विजय यादव, महिला मोर्चा अध्यक्षा गायत्री राऊत, आसावरी जुगदार, विद्या बनछोडे, मंगल निपाणीकर ई. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा