Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

करोनाचा लहान मुलांनाही धोका; जळगावात ६ वर्षांची चिमुकली दगावली



 करोनाचा लहान मुलांनाही धोका; जळगावात ६ वर्षांची चिमुकली दगावली



जळगाव:जळगाव जिल्ह्यात करोना संसर्ग वेगाने वाढत आहे. दररोज करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंचा आकडाही वाढताच आहे. बुधवारी दिवसभरात जळगाव जिल्ह्यात २० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात यावल तालुक्यातील एका ६ वर्षीय बालिकेचा समावेश आहे. दरम्यान, २४ तासांत नव्याने १००६ रुग्णांची भर पडली असून त्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने तो काहीसा दिलासा ठरला आहे. जिल्ह्यात करोना संसर्गाची स्थिती भीषण बनली आहे. दिवसभरात जळगाव शहर १७३, जळगाव ग्रामीण ४७, भुसावळ १३०, अमळनेर ६०, चोपडा ९७, पाचोरा ४७, भडगाव ११, धरणगाव ३३, यावल २५, एरंडोल ७३, जामनेर ३८, रावेर ७०, पारोळा २०, चाळीसगाव ५०, मुक्ताईनगर ९०, बोदवड ३५ आणि इतर जिल्ह्यातील ७ रुग्ण असे एकूण १००६ रुग्ण आढळून आले आहेत. तर ११२५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या १ लाख १९ हजार ९३४ इतकी झाली आहे तर १ लाख ७ हजार २६ रुग्ण करोनामुक्त झाले आहे.जिल्ह्यात २४ तासांत २० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात यावल तालुक्यातील एका ६ वर्षीय बालिकेचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भुसावळ, यावल तालुक्यातील प्रत्येकी ३, जळगाव शहर, एरंडोल, जामनेर, पाचोरा तालुक्यातील प्रत्येकी २ तर अमळनेर,चाळीसगाव, चोपडा, जळगाव, पारोळा व रावेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी पाचोरा तालुक्यात एका ४ वर्षीय बालिकेचा करोनाने मृत्यू झाला होता. त्यानंतर आता ६ वर्षीय बालिका दगावल्याने चिंता वाढली आहे. करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत तरुण वर्गासह लहान मुलंही बाधित होत आहेत. त्यात काही ठिकाणी मूलं दगावली असल्याने आरोग्य यंत्रणेपुढे हे नवे आव्हान ठरले आहे.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा