Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

नाशिक ऑक्सिजन गळती प्रकरण कोर्टात; राज्य सरकारला उत्तर द्यावं लागणार?




 नाशिक ऑक्सिजन गळती प्रकरण कोर्टात; राज्य सरकारला उत्तर द्यावं लागणार?


 मुंबई:-नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँकमधून गळती होऊन तब्बल २२ रुग्णांना जीव गमवावा लागल्याच्या घटनेचे पडसाद आज, गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयातही उमटण्याची चिन्हे आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना आवश्यक उपचार व सुविधा देण्यात सरकारी प्रशासने कमी पडत असल्याकडे आणि अव्यवस्थापनाकडे लक्ष वेधणारी जनहित याचिका उच्च न्यायालयातील महिला वकील स्नेहा मरजाडी यांनी केली असून त्याविषयी आज पुढील सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान राज्य सरकारला या घटनेविषयी उत्तर द्यावे लागण्याची चिन्हे आहेत.



नाशिकच्या घटनेचे पडसाद आज न्यायालयातही?

जनहित याचिकेतील मुद्दे अत्यंत गंभीर असल्याचे निरीक्षण मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने मंगळवारी नोंदवून राज्य व केंद्र सरकारला आज, गुरुवारी म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्यामुळे दोन्ही सरकारांना आज आपली बाजू मांडावी लागेल. अशावेळी करोना अव्यवस्थापनाचे आणखी एक उदाहरण नाशिकमधील दुर्दैवी घटनेच्या निमित्ताने समोर आल्याने त्याचे पडसाद 'व्हिडीओ कॉन्फरन्सिंग'द्वारे होणाऱ्या आजच्या सुनावणीत उमटण्याची चिन्हे आहेत. 'आमच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान नाशिकमधील दुर्दैवी घटनेकडे आम्ही न्यायालयाचे लक्ष वेधणार आहोत', असे स्नेहा यांचे वकील अॅड. अर्शिल शहा यांनीही 'मटा'ला सांगितले.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112




Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा