Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

पेट्रोल-डिझेल ; पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला इंधन दरांबाबत हा निर्णय

 



पेट्रोल-डिझेल ; पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला इंधन दरांबाबत हा निर्णय



मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर आहेत. दोन दिवसांपूर्वी गुरुवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात अनुक्रमे १६ पैसे आणि १४ पैशांची कपात केली होती. त्यामुळे ग्राहकांना किंचित दिलासा मिळाला होता.आज शनिवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.८२ रुपयांवर स्थिर आहे. डिझेलचा भाव ८७.८१ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.४० रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८३ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.४३ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.७३ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोलचा भाव ९०.६२ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.६१ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.४३ रुपये असून डिझेल ८५.६० रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८८.९८ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर पेट्रोल दर ९८.४१ रुपये आहे.कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यात १६ वेळा इंधन दरवाढ केली होती. यामुळे काही शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली होती. त्या १६ दिवसात पेट्रोल ४.७४ रुपयांनी महागले होते. तर डिझेलमध्ये या १६ दिवसांत झालेल्या दरवाढीने ४.५२ रुपयांची वाढ झाली होती. तर एप्रिलच्या पहिल्या दोन आठवड्यात इंधन दर स्थिर ठेवले होते.जागतिक कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ०.५७ डॉलरच्या तेजीसह ६६.९४ डॉलरवर गेला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.५८ डॉलरच्या तेजीसह ६३.४६ डॉलर झाला. मागील काही दिवस इंधन मागणी वाढल्याचे दिसून आले आहे.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


 


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा