Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

तरुणीवर सामूहिक अत्याचार; व्हायरल व्हिडीओवरून एका महिलेसह पाच बांगलादेशींना अटक



 तरुणीवर सामूहिक अत्याचार; व्हायरल व्हिडीओवरून एका महिलेसह पाच बांगलादेशींना अटक



एका तरुणीवर बलात्कार करून व्हिडीओ बनवणाऱ्यांना बंगळुरूत पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत आरोपींचा शोध सुरू केला होता. या प्रकरणात केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनीही ट्विट करत आरोपींना पकडण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील नागरिकांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं. दरम्यान, या प्रकरणी आरोपींविरुद्ध बंगळुरूतील राममूर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एका तरुणीवर सामूहित अत्याचाराचा आणि अनैसर्गिक कृत्य करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ आसाम पोलिसांच्या निदर्शनास आला आहे. त्यानंतर पोलिसांनी व्हिडीओतील आरोपींची दृश्य सोशल मीडियावर शेअर करत, या घटनेबद्दल कुणालाही काही माहिती असल्याचं माहिती देण्याचं आवाहन केलं होतं.आसाम पोलिसांचं हे ट्विट केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनीही रिट्विट केलं. सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील नागरिकांना त्यांनी आवाहन केलं होतं. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना मदत करावी, असं रिजिजू म्हटले होते. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरूच होता. बंगळुरू पोलिसांना आरोपींबद्दलची माहिती मिळाली. पोलिसांनी व्हिडीओत दिसणाऱ्या आरोपींसह एका महिलेला अटक केली.“व्हिडीओतील दृश्य आणि प्राथमिक चौकशीच्या आधारावर दोन महिलांसह सहा जणांविरुद्ध बलात्कार आणि हल्ला केल्याचा गुन्हा राममूर्ती पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पीडितेचा शोध घेण्यासाठी एक पथक नियुक्त करण्यात आलं असून, तपासात पीडितेची मदत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असं बंगळुरूचे पोली आयुक्त कमल पंत यांनी ट्विट करून सांगितलं. “हे सर्व एकाच ग्रुपमधील असून, ते बांगलादेशी आहेत. या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडिताही बांगलादेशी आहे. तिला भारतात विक्रीसाठी आणण्यात आलं होतं. पैशांच्या वादावरून त्यांनी तिचा छळ केला आणि क्रूर अत्याचार केले. या प्रकरणाचा तपास केला जात आहे,” असंही पंत यांनी सांगितलं.



......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment