Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

मृत्यूचं तांडव सुरुच! सर्वाधिक करोना मृत्यूंच्या यादीत भारत जगात तिसऱ्या स्थानी




 मृत्यूचं तांडव सुरुच! सर्वाधिक करोना मृत्यूंच्या यादीत भारत जगात तिसऱ्या स्थानी


करोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला आहे. दररोज लाखोंच्या संख्येनं करोनाबाधित आढळून येत असून, गेल्या काही आठवड्यांपासून करोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाणही चिंता वाटावी इतकं वाढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज साडेतीन हजारांच्या आसपास रुग्णांवर करोना, ऑक्सिजनअभावी वा बेड न मिळाल्याने मृत्यू ओढवत आहे. मृत्यूचं हे थैमान सुरूच असल्याचं गेल्या २४ तासांतील आकडेवारीतून स्पष्ट होताना दिसत आहे. भारतातील एकूण करोना मृतांची संख्या सव्वादोन लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे. तर करोना मृत्यूंच्या यादीत जगात भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील २४ तासांतील आकडेवारी जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेली आकडेवारी काहीसा दिलासा देणारी असली, तरी मृत्यूंच्या बाबतीत चिंता कायम आहे. देशातील करोना रुग्णवाढ मंदावली असल्याचं दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात तीन लाख ५७ हजार २२९ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत ३ लाख २० हजार २८९ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. म्हणजे नवीन रुग्ण आणि घरी परतलेले रुग्ण ही संख्या दिलासा देणारी आहे. मात्र, देशात दररोज होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत कोणतीही घट झाली नसल्याचं दिसत आहे.देशात गेल्या २४ तासांत ३ हजार ४४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण करोनाबळींचा संख्या दोन लाख २२ हजार ४०८ इतकी झाली आहे. तर देशात सध्या ३४ लाख ४७ हजार १३३ रुग्ण उपचाराधीन आहेत. करोना मृत्यूंच्या यादीत जगात भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत अमेरिका (५,९१,०६२) पहिल्या क्रमांकावर आहे, तर ब्राझील (४,०७,७७५) दुसऱ्या क्रमांकावर आहे.




.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा