Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

पेट्रोल-डिझेल महागले; निवडणुका संपताच कंपन्यांकडून इंधन दरवाढीचा झटका




पेट्रोल-डिझेल महागले; निवडणुका संपताच कंपन्यांकडून इंधन दरवाढीचा झटका


मुंबई : पाच राज्यांमधील निवडणूक संपताच पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा झटका दिला आहे. कंपन्यांनी आज पेट्रोलमध्ये १५ पैसे आणि डिझेलमध्ये १८ पैशांची वाढ केली.आजच्या दरवाढीने मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९६.९५ रुपये झाला आहे. तर दिल्लीत पेट्रोल ९०.५५ रुपये झाले आहे. चेन्नईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९२.५५ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोल आज १४ पैशांनी महागले आहे. कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९०.७६ रुपये झाला आहे.पेट्रोलप्रमाणेच आज डिझेलच्या दरात देखील वाढ झाली आहे. आज मुंबईत डिझेल १७ पैशांनी महागले आहे. एक लीटर डिझेलचा भाव ८७.९८ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेलचा भाव १८ पैशांनी वाढला असून तो ८०.९१ रुपये झाला आहे. चेन्नईत डिझेल ८५.९० रुपये प्रती लीटर आहे. कोलकात्यात डिझेल ८३.७८ रुपये प्रती लीटर आहे.यापूर्वी १५ एप्रिल २०२१ रोजी कंपन्यांनी इंधन दरांचा आढावा घेतला होता. त्यावेळी पेट्रोल दरात १६ पैशांची तर डिझेलमध्ये १४ पैशांची कपात करण्यात आली. तर त्याआधी दोन आठवडे इंधन दर जैसे थेच ठेवण्यात आले होते. २४ मार्चपासून देशभरात पेट्रोल ७७ पैशांनी तर डिझेल ७४ पैशांनी स्वस्त झाले आहे. तर २०२१ मध्ये २६ वेळा झालेल्या दरवाढीने पेट्रोल ७.४६ रुपये आणि डिझेल ७.६० रुपयांनी महागले होते.एप्रिल महिन्यात क्रूडचा भाव १० टक्क्यांनी वाढला आहे. आज सिंगापूरमध्ये कच्च्या तेलाच्या भावात किंचित वाढ झाली आहे . ब्रेंट क्रूडचा भाव ६७.०८ डॉलर झाला. त्यात ०.३२ डॉलरची वाढ झाली. यूएस वेस्ट टेक्सास इंटरमिडिएटमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ६३.९१ डॉलर प्रती बॅरल झाला. त्यात ०.३३ डॉलरची वाढ झाली. एप्रिल महिन्यात ब्रेंट क्रूडच्या भावात ८ टक्के वाढ झाली आहे. तर डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १० टक्क्यांनी वधारला आहे.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा