Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांना अटक

 


रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांना अटक


 एमआयडीसी प्लॉट क्रमांक एक्स 50 येथे हॉस्पिटलचे बांधकामाकरिता राजस्थान येथील कामगार कामास आहेत दिनांक 28 5 2021 रोजी रात्री 01.00 ते 02.00 वाजताची दरम्याने कामगार झोपलेले असताना कामगारांच्या बॅगेतून रोख रक्कम 8,000/- व 2000/- रु सॅमसंग कंपनीचा मोबाइल असा एकूण 10 हजार किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्या बाबत रत्नागिरी  ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 87/2021 भादंवि.क 379,34 प्रमाणे दि.28/05/2021 रोजी 17.31 वाजता दाखल आहे सदर गुन्ह्याचे तपासकामी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री विनय चौधरी यांनी एक पथक तयार करून पथकास गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने सूचना व मार्गदर्शन केले त्याप्रमाणे सदर पथकाने सीसीटीव्ही फुटेज बातमीदार मार्फत माहिती काढून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदरची चोरी ही मिरकरवाडा येथील वसीम नजीर सोलकर व सलीम मुल्ला यांनी केली असल्याचा संशय होता वसीम सोलकर याचे वर अशा प्रकारच्या अनेक चोरीचे गुन्हे दाखल असल्याने लागलीच पथकाने मिरकरवाडा येथे सापळा रचून मिरकरवाडा जेट्टी भागात शोध घेत असताना एका पडक्या इमारतीत लपून बसलेले आढळून आले त्यांचेकडे सदर गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता आरोपी 1) वसीम नजीर सोलकर वय 32 राहणार मिरकरवाडा पाद्री मुल्ला रत्नागिरी व आरोपी क्रमांक 2) सलीम  इसाक मुल्ला वय 22 राहणार मुरुगवडा झोपडपट्टी रत्नागिरी यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून गुन्ह्यात चोरीस गेलेली रोख रक्कम 8,000/- रु. हस्तगत करण्यात आलेली आहे. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक विनित  चौधरी, पोलीस अंमलदार विनोद भितळे, किशोर जोशी, मोहन कांबळे, वैभव मोरे यांनी केली आहे


......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment