Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

फुरसुंगी येथील कॅनॉलमध्ये आढळले दोन मृतदेह; एकाची ओळख पटेना



 फुरसुंगी येथील कॅनॉलमध्ये आढळले दोन मृतदेह; एकाची ओळख पटेना


 पुणे:-लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फुरसुंगी गावातील कॅनॉलमध्ये मंगळवारी सकाळी एका महिलेचा आणि पुरुषाचा मृतदेह आढळून आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी हे दोन्ही मृतदेह बाहेर काढले. दरम्यान, सोमवारी रात्री एक महिला कॅनॉलमध्ये पडल्याची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली होती. त्याच महिलेचा हा मृतदेह असल्याची प्राथमिक माहिती असून, पुरुष मृतदेहाची ओळख पटलेली नाही.फुरसुंगी येथे कॅनॉलमध्ये एका पुरुषाचा मृतदेह वाहून आल्याची वर्दी लोणी काळभोर पोलिसांनी अग्निशमन दलाला सोमवारी सकाळी दिली. त्यानुसार अग्निशमन दलाचे जवान त्या ठिकाणी पोहोचले. जवान आणि परिसरातील कार्यकर्ते बच्चूसिंग टाक यांनी पुरुषाचा मृतदेह बाहेर काढला. त्याचवेळी एका महिलेचाही मृतदेह वाहत येत असल्याचे जवानांना दिसले. त्यांनी महिलेचा मृतदेह देखील बाहेर काढला. दोन्ही मृतदेह लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

शिंदेवाडीतील महिलेचा मृतदेह

हडपसर परिसरातील शिंदेवादी येथे सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एक महिला कॅनॉलमध्ये पडल्याची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली होती. त्यानुसार जवानांनी रात्री महिलेचा शोध घेतला होता. मात्र, महिला सापडली नव्हती. मंगळवारी सकाळी फुरसुंगी येथे महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी शिंदेवाडीच्या घटनेतील महिलेच्या नातेवाईकांना कळवले. त्यांनी ओळख पटवल्यानंतर तीच महिला असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, पुरुष मृतदेहाची ओळख पटलेली नाही.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा