Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

नागपूरकरांची चिंता वाढली, करोनानंतर म्यूकरमायकोसिसचा 'असा' वाढतोय धोका




नागपूरकरांची चिंता वाढली, करोनानंतर म्यूकरमायकोसिसचा 'असा' वाढतोय धोका


नागपूर : उपराजधानी भोवती कोविड विषाणूचा विळखा सैल होत असला तरी नवीच धास्ती नागपूरकरांच्या मनात बसली आहे. करोनानंतर आता म्युकरमायकोसिस या बुरशीची लागण झालेल्या ३ जणांचा रविवारी मृत्यू झाला. सोबतच नव्याने २६ जणांना या आजाराची लागण झाल्याचे समोर आलं आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकट्या नागपूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे निदान होऊन मरण पावलेल्यांची संख्या आता ८५ च्या वर गेली आहे. शहरातील विविध शासकीय व खासगी रुग्णालयांत एकीकडे या आजारावर आवश्यक इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. रुग्ण संख्येच्या तुलनेत निम्मी औषधेही मिळत नसल्याने रुग्णांचे जीव टांगणीला लागत आहेत. इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी या इंजेक्शनचे वितरण नियंत्रित केले. रविवारी दिवसभररात शासकीय रुग्णालयांत ८, खासगी रुग्णालयांत १८ असे एकूण २६ नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे नागपुर जिल्ह्यातील या आजाराच्या एकूण रुग्णांची संख्या १ हजार १३२ रुग्णांवर पोहचली. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांपैकी ५८५ रुग्णांवर विविध प्रकारच्या शल्यक्रिया कराव्या लागल्या आहेत. त्यातील ३०० रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली गेली आहे. तर सध्या ६४ खासगी व काही शासकीय रुग्णालयांमध्ये ६१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील ३३७ रुग्ण शासकीय रुग्णालयांत तर २८१ रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.


......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment