Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

तिसऱ्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू



तिसऱ्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू


चिपळूण : शहरालगतच्या खेर्डी बाजारपेठेतील शुभम हाईटस् या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. संकेत अशोक महादे (२५, खेर्डी बाजारपेठ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची खबर त्याचा भाऊ संदेश अशोक महादे यांनी दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या  माहितीनुसार, संकेतला दारुचे व्यसन होते. दारुच्या नशेत असताना त्याचा तोल जाऊन शुभम हाईटस् या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन तो खाली पडला. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र देसाई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी. एल. चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा