मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात ते आपल्या नियमीत तपासणीसाठी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: गाडी चालवत रुग्णालयात आले होते.
उद्धव ठाकरे हे स्वत: गाडी चालवत रुग्णालयात आले होते, त्यांची प्रकृतीही उत्तम आहे. फक्त रुटीन चेकअपचा भाग म्हणून ते रुग्णालयात गेले आहेत. यापूर्वी मुख्यमंत्र्यांचं रुटीन चेकअप लीलावती रुग्णालयात होतं. मात्र उद्धव ठाकरे हे सध्या वर्षा बंगल्यावर असल्याने जवळचं रुग्णालय म्हणून, मुख्यंत्र्यांनी एचएन रिलायन्स रुग्णालय निवडलं असल्याचं महाविकास आघाडीमधील एका नेत्यानं सांगितलं.
हेही वाचा: गेम अपडेटच्या नादात 3.2 लाख गायब
चेकअप झाल्यानंतर तासाभरातच उद्धव ठाकरे माघारी परतले. यावेळी रुग्णालय परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. रश्मी ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती, त्यावेळी त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार झाले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री स्वत:ही रुटीन चेकअपसाठी याच रुग्णालयात पोहोचले.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा