Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

मुसळधार पावसाचा इशारा; अंधेरीत दोन तर कुर्ल्यात एक पथक बचावकार्यासाठी सज्ज
मुसळधार पावसाचा इशारा; अंधेरीत दोन तर कुर्ल्यात एक पथक बचावकार्यासाठी सज्जमुंबईः मुंबई आणि उपनगरात रविवारी आणि सोमवारी हवामान खात्यानं रेड अलर्टचा इशारा दिला आहे. मात्र, त्याआधीच मुंबईला पावसानं झोडपून काढलं आहे. आजही मुंबई व उपनगरात मुसळधार पावसाचा आंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, कोकण किनारपट्टीला देखील रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर सिंधुदुर्गमध्ये एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे 


- बेलापूर किल्ल्याच्या जुना बुरुजची अर्धी भिंत कोसळली; घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी दाखल

- रेल्वे रुळांवर पाणी; मध्य रेल्वेवरील दादर ते कुर्ला दरम्यान वाहतूक ठप्प

- नौदलाच्या प्रत्येक पथकात १५ जवान व रबरी बोटी

- मालाड, मानखुर्द, कुलाबा, घाटकोपर, व वरळीत नौदलाची पाच पथके सज्ज

- अंधेरीत दोन तर कुर्ल्यात एक पथक बचावकार्यासाठी सज्ज

- कुर्ला पश्चिम भागात धोक्याचा अंदाज घेण्यासाठी एनडीआरएफचे पथक दाखल

- मुंबईत पावसाचा जोर वाढला; जुहू चौपाटी पर्यटकांसाठी बंद

- दुपारी समुद्राला भरती येणार; ४. ३२ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

- मुंबई, उपनगरात विजांच्या कडकडाटासह पाऊस पुन्हा सुरु

- मुंबई, पालघर, ठाणे, रायगडमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; पुढील तीन तास महत्त्वाचे

- मोठ्या झाडांखाली उभं राहू नका; हवामान विभागाचं आवाहन

- नालासोपारा रेल्वे स्थानकात पाणी भरले

- नवी मुंबई, पनवेलमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी

- महाड, पेणमध्ये एनडीआरएफची टीम तैनात; नागरिकांनी घराबाहेर पडू नये; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

- रायगडला मुसळधार पावसाचा इशारा; धोकादायक इमारतीतील १११ जणांचं स्थलांतर

- मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी; हवामान विभागाची माहिती

- मुंबईत २४ तासांत ७९.६६ मिमि पावसाची नोंद; हवामान विभागाची माहिती

- सिंधुदुर्गः समुद्र व नदी किनारी भागातील नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सूचना

- सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; एनडीआरएफचं पथक दाखल

- वसई, विरार, नालासोपाऱ्यात पावसाची हजेरी; रस्त्यांवर भरले पाणी

- मुंबईत रात्रीपासून पावसाला सुरुवात; सखल भागात पाणी साचले

- ठाण्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, सखल भागात पाणी साचले

मुंबईत मुसळधार पाऊस सुरूच; पुढचे ४८ तास धोक्याचे

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment