Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

हातखंब्यात खवल्यांची तस्करी करणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या

 


हातखंब्यात खवल्यांची तस्करी करणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या 


रत्नागिरी:-खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या एका तरुणाला सापळा रचून दहशतवादी विरोधी पथकाने मोठ्या शिताफीने मुसक्या आवळल्या. हि कारवाई हातखंबा परिसरात करण्यात आली असून नाचणे परिसरातील तरुणाला तस्करीप्रकरणी अटक केली आहे.पोलीस अधीक्षक यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन पोलीस खाते व वन विभाग यांनी एकमेकांच्या सहयोगाने कामगिरी करण्याचे आवाहन केले होते. या योजनेचा भाग म्हणुन आज १५ जून रोजी वन विभागातील अनेक तज्ञांकडुन रत्नागिरी जिल्ह्यांच्या ३२ अधिकाऱ्यांना ऑन लाईन प्रशिक्षण देण्यात आले. या पार्श्वभुमीवर पोउनि विनायक नरवणे यांना अशी माहिती मिळाली कि हातखंबा येथून खवले मांजराची तस्करी होणार आहे. त्यानुसार त्यांनी त्यांच्या पथकासह सापळा रचला होता. याच दरम्यान एका यामाहा कंपनीच्या मोटार सायकलवरील इसमास थांबवून त्याची झडती घेतली असता त्याचकडे ३.४६४ किलो ग्रॅम खवले मांजराचे खवले मिळून आली. खवल्याची वाहतुक करणारा सचिन गजानन ढेपसे (वय ४१ वर्षे, रा. सुपलवाडी, नाचणे रत्नागिरी) यास ताब्यात घेऊन त्यांचेकडील मोटार सायकल जप्त केलेली आहे.हि कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ . मोहित कुमार गर्ग यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि विनायक नरवणे, सपोफौ पांडुरंग गोरे, पोहेकॉ महेश गुरव, आशिष शेलार, राजेश भुजबळराय, परेश पाटोळे, उदय चांदणे यांनी केलेली आहे


.....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment