Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

निसर्ग अमर..…:-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास
 निसर्ग अमर..…


पाण्यातले मासे । पाण्यातच बरे ।

प्राण त्यांचे खरे । पाण्यामध्ये ।।


तैसेचि मनुष्य । बरे धरेवर ।

सेवेमध्ये कर । रुजू द्यावे ।।


संथ नदीमध्ये । पाणी शुद्ध फार ।

जीवना आधार । नदी देई ।।


उथळ येताच । रौद्र रूप घेई ।

प्राण सुद्धा नेई । अनेकांचे ।।


व्यर्थ अभिमान । करायचे नाही ।

व्हावयाचे नाही । कोणी ।।


निसर्ग रक्षक । भक्षक निसर्ग ।

त्यांच्यामुळे स्वर्ग । धरेवर ।।


आव्हान देऊन । आणू नका राग ।

स्वतः लावू आग । नका कोणी ।।


ज्यांच्यात्यांच्या स्थानी । सर्वांनी राहावे ।

प्रेमाने वागावे । पशूंसवे ।।


निसर्गात भासे । अजुला ईश्वर ।

निसर्ग अमर । हेचि सत्य ।।अजय रमेश चव्हाण, तरनोळी©️®️
ता.दारव्हा, जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
 फ्रेश न्यूज साहित्य सहवास २ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा