जम्मू-काश्मीर: सुरक्षा दलाला मोठं यश; लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडर नदीम अबरारचा खात्मा
मुंबई :जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाला दहशतवादी विरोधी कारवाईत मोठं यश मिळालं आहे. श्रीनगरच्या मलूरा पारिंपोरा परिसरात सोमवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत भारतीय लष्करानं लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर नदीम अबरार याचा खात्मा केला आहे. त्याच्यासोबत आणखी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलं आहे. दरम्यान चकमकीत सीआरपीएफचा एक अधिकारी आणि दोन जवान जखमी झाले आहेत. नदीम अबरार हा श्रीनगरच्या बारामुल्ला परिसरातील अनेक हत्याकांड आणि दहशतवादी कारवायांचा मास्टरमाईंड होता.जम्मू-काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार हायवेवर दहशतवादी हल्ला करण्यासंदर्भात लष्कराला माहिती मिळाली होती. याचीच माहिती घेत हायवेजवळ जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे (सीआरपीएफ) पथक चेकपोस्टवर तैनात करण्यात आले होते. परिमपोरा नाक्यावर एक वाहन थांबवून चौकशी केली असताना मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीनं बॅग उघडून हँड ग्रेनेड काढला. त्यानंतर तातडीनं सुरक्षा दलानं प्रत्युत्तर देत त्याला पकडलं. वाहनातील तिघांनाही पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. तिघांनीही चेहऱ्यावर मास्क लावला होता. मास्क काढल्यानंतर लक्षात आलं की तिघांपैकी एक जण लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबाबर होता. जेकेपी, सीआरपीएफ आणि लष्कराकडून तिघांची कसून चौकशी झाली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि पिस्तल हस्तगत करण्यात आले. कसून चौकशी केल्यानंतर तिघांनी राहत्या घरात मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्रास्त्र ठेवलेली असल्याचं समजलं. त्यानुसार तिघांना त्यांच्या घरी नेण्यात आलं होतं.
घरी पोहोचताच सुरू झाली चकमक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा