Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

दहशतवाद्यांकडून दिवसाढवळ्या चेक पोस्टवर गोळीबार, चौघांचा मृत्यू




दहशतवाद्यांकडून दिवसाढवळ्या चेक पोस्टवर गोळीबार, चौघांचा मृत्यू


श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील सोपोर भागात शनिवारी पुन्हा एकदा सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला झालाय. आरामपोरा नाक्यावर हा हल्ला झाल्याची माहिती मिळतेय. या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे.दहशतवाद्यांकडून पोलीस आणि सीआरपीएफच्या एका संयुक्त तुकडीला निशाणा बनवण्यात आलं. या टीमवर दहशतवाद्यांकडून बेधुंद गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत तर दोन सामान्य नागरिकांनाही यात आपला जीव गमवावा लागलाय. हे दोघे जण भाजी विक्रिते असल्याचं समजतंय. गंभीर जखमी झालेल्या दोन जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.उत्तर काश्मीरच्या सोपोर जिल्ह्यात आरामपोरा हा भाग येतोय. नाक्यावर पोलीस आणि सीआरपीएफची एक संयुक्त टीम तैनात करण्यात आली होती.सुरक्षा दलाची नजर चुकवून पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले. तर दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन स्थानिकांनाही गोळ्या लागल्या. तातडीनं त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.हा हल्ला लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी घडवून आणल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय. हल्लेखोरांना पकडण्यासाठी सुरक्षा दलानं एक मोहीम हाती घेतलीय. या संपूर्ण परिसराला घेराव घालून सर्च ऑपरेशन राबवण्यात येतंय.

नाक्यावर हल्ल्याची आठवड्याभरातली दुसरी घटना

चेक पोस्टवर या आठवड्यातला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. शुक्रवारीदेखील जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यातील सुरक्षादलाच्या एका चेक पोस्टवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. अगलर भागात केंद्रीय राखीव पोलीस दल आणि स्थानिक पोलिसांनी एका नाका उभारला होता. या नाक्यावर दुपारच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. याला प्रत्यूत्तर म्हणून सुरक्षादलानंही गोळीबार केला. मात्र, हल्लेखोर घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरले. 


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment