Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

वळणाचा अंदाज न आल्याने वेरळ घाटामध्ये ट्रेलर फसला

 


वळणाचा अंदाज न आल्याने वेरळ घाटामध्ये ट्रेलर फसला


लांजा: वळणाचा अंदाज न आल्याने मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रेलर साईडपट्टीवर फसल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ घाटामध्ये शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्याने घडली. यामुळे महामार्गावर दोन तास एकेरी वाहतूक सुरू होती. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम पावसाळ्यात थांबविण्यात आले आहे. लांजा शहरामध्ये ओव्हर ब्रिजसाठी प्लेअर उभारण्यास ड्रिल मारण्याचे काम पावसाळ्यात बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ही ड्रील मशीन घेऊन ट्रेलर मुंबईच्या दिशेने सकाळी ८ वाजता निघाला होता. वेरळ घाटातील यु आकाराच्या वळणावर उतार उतरत असताना चालकाला वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे साईटपट्टीवर ट्रेलरचे पुढील चाक मातीत रुतले. त्यामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहणाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.  ट्रेलरला थोडासे बाजूला केल्यानंतर दोन तासाने वाहतूक सुरळीत करण्यात आली.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment