Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

व्यापारी म्हणजे जणूकाही चोरच...अडकतोय कायद्याच्या कचाट्यात



 व्यापारी म्हणजे जणूकाही चोरच...अडकतोय कायद्याच्या कचाट्यात


◾️ रत्नागिरीत आज देखील व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल


रत्नागिरी : कोरोना संक्रमण सुरु झाल्यापासून म्हणजेच मागील सव्वा वर्षापासून आपली दुकाने बंद ठेऊन प्रशासनाला नेहमीच सहकार्य करणाऱ्या व्यापाऱ्याच्या पदरात अजूनही निराशाच पडत असल्याचे पहावयास मिळत आहे. शासनाने अनलॉकच्या नव्या नियमानुसार सुमारे ७० टक्के अस्थापना उघडण्यास परवानगी दिली आहे मात्र अजूनही ३० टक्के अस्थापना बंद आहेत. रस्त्यावर नागरिकांना फिरायला बंदी नाही, ७० टक्के अस्थापना सुरळीत चालू आहेत मात्र ३० टक्के अस्थापना सुरु केल्यास कोरोनाचा फैलाव होतो हे गणितच न पटण्यासारखे आहे असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मागील दोन महिन्यापासून व्यापार बंद ठेऊनही जिल्ह्यात कोरोनाचा आकडा कमी करण्यात प्रशासनाला अपयश आलय आणि याचे खापर केवळ व्यापाऱ्यांवर फोडले जातंय हे अन्यायकारक असल्याचे मत व्यापारी व्यक्त करीत आहेत. आज देखील काही व्यापारी कायद्याच्या कचाट्यात अडकल्याचे पहावयास मिळत असून व्यापारी म्हणजे चोर आहेत अशा पद्धतीने व्यापाऱ्यांना वागणूक दिल्याचे बोलले जात आहे. जेव्हा आम्ही सांगत होतो कडक लॉकडाऊन करा तेव्हा आमच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष करीत नियमांची अंमलबजावणी न करता लॉकडाऊन केवळ कागदावरच ठेवला असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. कापड व्यापारी, मोबाईल विक्रेते, सोनार, जनरल स्टोअर्स यांसारखे अनेक छोटे व्यापारी केवळ अनलॉकच्या कॅटेगरीत बसत नसल्याने कायद्याच्या कचाट्यात अडकताना दिसत आहेत. यामुळे व्यापारी प्रचंड संताप व्यक्त करीत आहेत


.....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025



Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment