Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

ग्रामपंचायत सदस्य वैभव कोकरेंच्या विनंतीला मान देत टीम परिवर्तन आणि मानसन्मान प्रतिष्ठानचा खिणगिणी गावातील



 ग्रामपंचायत सदस्य वैभव कोकरेंच्या विनंतीला मान देत टीम परिवर्तन आणि मानसन्मान प्रतिष्ठानचा खिणगिणी गावातील

 गरजूंच्या मदतीला हात.._


सध्या कोरोनामुळे कैक परिवारांची झालेली वाताहत ऐकिवात येते. गेले वर्षभर यासाठी खारुताईचा वाटा म्हणून अनेक मार्गांनी मदत मिळविण्यासाठी वैभव कोकरे प्रयत्न करत आहेत. वेळेला अनेकांना विनंती करत विविध मार्गांनी जे काही मिळेल ते गरजूंपर्यंत पोचविण्यासाठी सर्व मार्ग अवलंबले.सध्या मुंबई आणि नजीकच्या भागात टीम परिवर्तन आणि मानसन्मान प्रतिष्ठान गरजूंसाठी तारणहार ठरत आहेत. शेवटच्या घटकापर्यंत मदत मिळवण्यासाठी या संघटनांचे कार्यकर्ते रात्रीचा दिवस करतायत. याच दोन्ही दातृत्व असणाऱ्या संघटनांना मदतीसाठी वैभव कोकरे यांनी विनंती केली. फार विलंब न लावता तात्काळ मदत म्हणून जवळपास 10 कुटुंबांना किमान वीसेक दिवस पुरेल इतके घरगुती साहित्य पुरविण्याची व्यवस्था झाली. वैभव कोकरेंनी खिणगिनी येथील अधिक गरजू असणाऱ्या कुटुंबांना ती मदत तात्काळ सुपूर्द केली. अनेक घरात किमान 20 दिवस आपल्यामार्फत दिलेल्या साहित्यातून जर चूल पेटणार असेल तर याहून मोठं पुण्य ते काय.?टीम परिवर्तन आणि मानसन्मान प्रतिष्ठानच्या सर्व शिलेदरांचे आभार मानावे तितके कमी आहेत. वैभव कोकरे आणि मदत मिळालेली गरजू कुटुंब या दोन्ही संघटनांच्या सदैव ऋणात राहतील..उपसरपंच श्री.मनोहर दिवाळे,ग्रामपंचायत सदस्य श्री.सचिन देव साहेब साहेब,भास्कर वालम,कौस्तुभ वालम कमलाकर राऊत,गणपत राऊत आणि  कुणाल वालम यांच्या हस्ते सदर वस्तू आज दिनांक 13 जून 2021 रोजी या कुटुंबांना देण्यात आल्या.


      तूषार वारंग व संजय जांगळी यांचे विशेष सहकार्य लाभल्या बद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद



आपला सहकारी
श्री.विवेक वालम
      सचिव
मौजे खिणगिणी ग्रामविकास मंडळ मुंबई



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment