Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी!




 SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी!


स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (sbi bank) ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढील दोन दिवसात महत्त्वाच्या नियमात बदल होणार आहेत. एटीएममधून पैसे काढण्यापासून ते चेकबुकपर्यंत काही नियमांत बदल होणार आहेत.हे नियम 1 जुलैपासून लागू होत आहेत. ग्राहकांना काही अधिकचं शुल्क एक तारखेपासून द्यावं लागेल. बदलणारे नियम बेसिक सेव्हिंग अकाउंट डिपॉझिट (BSBD) अकाउंट होल्डर्ससाठी लागू होणार आहेत.बीएसबीडी खातेधारकांना दरमहा चार वेळा मोफत पैसे काढता येतात, ज्यात एटीएम आणि बँक शाखांचा समावेश आहे. मोफत मर्यादेनंतर बँक प्रत्येक व्यवहारावर 15 रुपये अधिक जीएसटी घेईल. पैसे काढण्यावर शुल्क होम ब्रँच, एटीएम आणि गैर एसबीआय एटीएममधून पैसे काढण्यावर लागू होईल.


चेकबुक शुल्क 


-SBI BSBD खातेधारकांना एका फायनान्शिअल इयरमध्ये 10 चेकची कॉपी मिळते. आता 10 चेकच्या चेकबुकवर चार्जेस द्यावे लागतील. 10 चेकच्या पानांसाठी बँक 40 रुपये आणि जीएसटी शुल्क आकारेल


-25 चेक लीवसाठी बँक 75 रुपये आणि जीएसटी चार्ज करेल.


-इमर्जन्सी चेकबुकवर 10 पानांसाठी 50 रुपये अधिक जीएसटी द्यावा लागेल.


-ज्येष्ठ नागरिकांना चेकबुकवर नवीन सेवा शुल्कातून सूट दिली जाईल


एटीएममधून पैसे काढण्याचे नियम


SBI ATM किंवा बँकेतून पैसे काढणं चार वेळा मोफत आहे. यानंतर पैसे काढण्यासाठी 15 रुपये आणि जीएसटी शुल्क लागू करण्यात येतं. एसबीआयने ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. एसबीआयने अलीकडेच धनादेश वापरुन रोख पैसे काढण्याची मर्यादा वाढवून दररोज एक लाख रुपये केली आहे.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment