Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

11 मिनिटं, 7 बॉम्बस्फोट अन् 189 बळी; मुंबईतील मन हेलावून टाकणाऱ्या काळ्या घटनेला 15 वर्ष पूर्ण

 


11 मिनिटं, 7 बॉम्बस्फोट अन् 189 बळी; मुंबईतील मन हेलावून टाकणाऱ्या काळ्या घटनेला 15 वर्ष पूर्ण 


मुंबई: आजच्याच दिवशी 2006 साली मुंबईत 11 मिनिटांत तब्बल 7 ठिकाणी भयानक विस्फोट (Bomb Blast) झाले होते. या दुर्दैवी घटनेत तब्बल 189 जणांचा हकनाक बळी (189 casualties) गेला होता. तर 800 हून अधिक जण या बॉम्बस्फोटात गंभीर जखमी झाले होते. या घटनेला आज 15 वर्ष पूर्ण झाले आहेत. पण अनेकांना या काळ्या दिवसाच्या आठवणी पुसता येत नाहीत. या घटनेत अनेकांनी आपल्या जीवाभावाच्या माणसांना कायमचं गमावलं होतं. या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेला आज 15 वर्षे पूर्ण झाले आहेत.

नेमकं काय घडलं त्यादिवशी?

11 जुलै, 2006 चा दिवस होता, सायंकाळचे 4 वाजून 35 मिनिटे झाली होती. मुंबईची लाइफलाइन असणाऱ्या लोकलनं हजारो लोकं प्रवास करत होते. दिवसभर काम करून थकलेले चेहरे घराच्या दिशेनं परतत होते. तर घरात आपली जीवाभावाची माणसं कामावरून घरी परत येणार म्हणून अनेकजण खूश होते. पण 11 जुलै 2006 च्या सायंकाळी केवळ 11 मिनिटांत संपूर्ण मुंबई हादरली होती. मुंबई आणि ठाणेदरम्यान लोकलमध्ये सात ठिकाणी भयानक विस्फोट झाले होते.माटुंगा रोड, माहिम, बांद्रा, खार रोड, जोगेश्वरी, बोरीवली आणि मीरा रोड याठिकाणी बॉम्बस्फोटचा भयानक नजारा घडला होता. या दुर्दैवी घटनेच तब्बल 189 निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला होता. तर 800 हून अधिक लोकं यामध्ये गंभीर जखमी झाले होते. यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात या बॉम्बस्फोटांमागे पाकिस्तानातील लष्कर ए तोयबा ही आतंकवादी संघटना असल्याचं तपासात उघड झालं होतं. याप्रकरणी विशेष न्यायालयानं सप्टेंबर 2015 मध्ये 12 जणांना शिक्षा सुनावली आहे.
या साखळी बॉम्बस्फोटासाठी दहशतवाद्यांनी प्रेशर कुकर बॉम्बचा वापर केला होता. दहशतवाद्यांनी हा कुकर बॉम्ब आरडीएक्स, अमोनियम नायट्रेट, इंधन तेल आणि खिळ्यांचा वापर करून बनवला होता. संबंधित सात प्रेशर कुकर टायमर द्वारे उडवले होते.



....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment