Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

कॉमेडीचा तडका, पाहा ‘हंगामा 2’चा ट्रेलर
कॉमेडीचा तडका, पाहा ‘हंगामा 2’चा ट्रेलर


बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि परेश रावल (Paresh rawal) यांच्या ‘हंगामा 2’ (Hungama 2) या चित्रपटाची (trailer release) चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर (ott platform) प्रदर्शित होणार आहे.विनोदाने ओतप्रोत या चित्रपटात शिल्पासोबत परेश रावल, मीझान जाफरी (Meezan Jafri), आशुतोष राणा (Ashutosh Rana), राजपाल यादव (Rajpal Yadav) आणि प्रणिता सुभाष महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. या विनोदी चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ज्यामध्ये परेश रावल यांचा विनोदी अंदाज सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणत आहे.तीन मिनिटांच्या ट्रेलरच्या सुरूवातीलाच प्रणिता सुभाष आपल्याबरोबर एका लहान मुलीला घेऊन आली आहे. ती मीझानच्या घरी जाऊन आशुतोष राणाला सांगते की, तिचे आणि मीझानचे कॉलेजपासून एकमेकांवर प्रेम आहे आणि हे मूल या दोघांचेच आहे.त्यानंतर वकील म्हणजे प्रवेश परेश रावल यांची एन्ट्री होते आणि इथून सुरु होतो कॉमेडीचा धमाल ‘हंगामा’. या ट्रेलरमध्ये अभिनेते राजपाल यादव यांचीही भन्नाट एंट्री दिसली आहे.या चित्रपटात शिल्पा शेट्टी चक्क परेश रावल यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली आहे. परेश रावल गोंधळून जातात की, मीझान त्यांची पत्नी शिल्पाचा प्रियकर आहे. परेश रावल यांचा हा गोंधळ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या पोट धरून हसायला लावतो. आता हा गोंधळ कसा दूर होतो, यासाठी तुम्हाला चित्रपटाची प्रतीक्षा करावी लागेल.‘हंगामा 2’ हा चित्रपट ‘हंगामा’ फ्रेंचायझीचा दुसरा चित्रपट आहे. अक्षय खन्ना, परेश रावल, आफताब शिवदासानी, रिमी सेन ‘हंगामा’मध्ये मुख्य भूमिकेत दिसले होते आणि हा सुपरहिट चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता.हंगामा 2’ थिएटरमध्ये नसून ओटीटी प्लॅटफॉर्मवर (ott platform) रिलीज होणार आहे. हा चित्रपट 23 जुलैला डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रियदर्शन यांनी ‘हंगामा 2’चे दिग्दर्शन केले आहे. अक्षय खन्ना या चित्रपटात एक कॅमिओ करताना दिसणार आहे.
....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment