Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

एकनाथ खडसे यांची ईडीकडून 9 तास कसून चौकशी*


 एकनाथ खडसे यांची ईडीकडून 9 तास कसून चौकशी

पुणे: 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरूवारी ८ तास चौकशी केली. पुण्यातील भूखंड खरेदी प्रकरणाचे काही महत्त्वाचे दस्तावेज १० दिवसांत सादर करण्याची सूचनादेखील ईडीकडून त्यांना देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे पाच वर्षांपूर्वी झालेल्या भूखंड खरेदी गैरव्यवहारप्रकरणी राज्याचे माजी महसूलमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी तब्बल नऊ तास कसून चौकशी केली. 
अटकेत असलेले त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना समोर बसवून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सकाळी अकराला हजर झालेले खडसे रात्री आठ वाजता ईडी कार्यालयातून बाहेर पडले.
पुण्याजवळील भोसरी औद्योगिक वसाहतीतील भूखंड ३१ कोटी रुपयांचा बाजारभाव असताना फक्त ३.७५ कोटी रुपयांत खरेदी करण्याच्या प्रकरणात ‘ईडी’कडून तपास सुरू आहे. यामुळे अनेक कोटी रुपयांच्या सरकारी महसुलाचे नुकसान झाल्याचा ‘ईडी’ला संशय आहे. त्याच प्रकरणावरुन ईडीने बुधवारी खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली. त्यानंतर गुरूवारी खडसेंची कसून चौकशी करण्यात आली.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment