Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

राजापूर तालुका रिक्षा चालक मालक संघटनेचा चिपळूणातील रिक्षा चालकांना मदतीचा हात





 राजापूर तालुका रिक्षा चालक मालक संघटनेचा चिपळूणातील रिक्षा चालकांना मदतीचा हात


चिपळूण:-चिपळूण मध्ये झालेल्या अतिवृष्टिमुळे आलेल्या पूराने अनेकांना याचा फटका बसला याची जाणीव होताच अनेक संस्था व संघटना या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी  धावून गेल्या  याची झळ हातावर पोट असणाऱ्या रिक्षा व्यावसायिकांना देखील मोठ्याप्रमाणात बसली अशा वेळी आपण देखील आपल्या रिक्षा व्यावसायिकांना काहीतरी मदत  करावी असे संघटनेचे अध्यक्ष अभिजित गुरव यांनी आपल्या सहकाऱ्यांना  सांगितले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे पदाधिकारी यांनी गेली दोन वर्षे  लॉक डाऊनमुळे रिक्षा व्यवसाय अडचणीत  असताना देखील सामाजिक बांधिलकिचे भान ठेवून या पूर स्थितित अडचणीत आलेल्या आपल्या रिक्षा व्यावसायिकांना आधार देण्यासाठी जाण्याचे निश्चित केले अध्यक्ष अभिजित गुरव यांच्या नेतृत्वाखाली सचिव संतोष सातोसे, उपाध्याक्ष संजय ओगले , ऋषिकेश इंदूलकर, वदू खलिपे,  मिंलिद धुळप, संपत  जाधव, गुलज़ार मस्तान, तानाजी कोंबडेकर, आदि रिक्षा व्यावसायिक शक्य असलेली मदत घेऊन चिपळूण येथे मदतीकरता गेले व त्यांनी चिपळूण रिक्षा संघटनेचे पदाधिकारी दिलीप खेतले,संजय जोशी,प्रशांत गोरीवले,गणेश खेडकर,रामदास भोजने,प्रशांत कदम व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने सर्व सामान्य रिक्षा चालकां पर्यंत पोच केली
यासाठी राजापूर मधील रिक्षा चालकांना माजी जि.प.सदस्य  दिनेश जैतापकर, माजी नगरसेवक दशरथ दुधवडकर ,संजय उर्फ अंधू दुधवडकर ,रामदास शिवदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले


--------------------
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment