Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

मामाच्या खून प्रकरणी भाच्याला जन्मठेप चिपळूण : मामाच्या खून प्रकरणी भाच्याला जन्मठेप 


रत्नागिरी:-तालुक्यातील कळकवणे येथे जुलै २०१७ मध्ये मामाचा त्याच्याच भाच्याने खून केल्याप्रकरणी भाचा विनोद बाबा सकपाळ ( ३४ , रा . कळकवणे ) याला गुरुवारी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व १० हजार रुपयांचा दंड सुनावला आहे चिपळूण तालक्यातील कादवड येथील जगन्नाथ बाबू चव्हाण ( ७० ) हे भाच्याकडे कळकवणे येथे राहण्यासाठी गेले होते . अशातच विनोद सकपाळ याने त्यांना मारहाण केली होती . त्याने हा प्रकार आपल्या मित्रालाही सांगितला होता . त्यानंतर त्याने २ जुलै २०१७ रोजी जगन्नाथ चव्हाण यांना पुन्हा मारहाण करून त्यांचा खून केला . खून केल्यानंतर त्याने त्यांना रिक्षाने कादवड येथे नेण्याचा प्रयत्न केला . मात्र , रिक्षा व्यावसायिकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला होता .याप्रकरणी अलोरे येथील स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी या प्रकरणाचा कसून तपास केला . तसेच या प्रकरणी विनोद सकपाळ याचा मित्र , रिक्षा व्यावसायिक यांच्यासह बारा साक्षीदार होते . विनोद सकपाळ हा खुनशी प्रवृत्तीचा असल्याचे उघड झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन . एस . मुमीन यांनी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे . याशिवाय १० हजार रुपये दंड व न भरल्यास सहा महिने कारावास होणार आहे . यावेळी अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील प्रफुल्ल साळवी यांनी मयताच्यावतीने बाजू मांडली , कोर्ट पैरवी म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस . जी . जाधव यांनी काम पाहिले .


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा