Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

सोन्यामध्ये पडझड सुरूच ; नफवसुलीने कमॉडिटी बाजारात सोने चांदीमधील तेजी ओसरली

 
सोन्यामध्ये पडझड सुरूच ; नफवसुलीने कमॉडिटी बाजारात सोने चांदीमधील तेजी ओसरली

मुंबई : नफावसुलीने सोने आणि चांदीला मोठा फटका बसला आहे. जागतिक बाजारातील अनिश्चिततेचे पडसाद कमॉडिटी बाजारात उमटत आहेत. सोन्याचा भाव पुन्हा एकदा ४७००० खाली घसरला आहे. मंगळवारी सोन्याच्या किमतीत २२५ रुपयांची घसरण झाली. चांदी ६०० रुपयांनी स्वस्त झाली. आज बुधवारी बकरी ईद निमित्त कमाॅडिटी बाजार बंद आहे. एमसीएक्सवर मंगळवारी सोने आणि चांदीमध्ये मोठी उलथापालथ दिसून आली. सोन्याचा भाव ४७८६९ रुपयांवर स्थिरावला. त्यात २२५ रुपयांची घसरण झाली. तत्पूर्वी सोने ४७७७१ रुपयापर्यंत खाली घसरले होते.चांदीला देखील नफावसुलीचा फटका बसला आहे. काल चांदीमध्ये ६४९ रुपयांची घसरण झाली. एक किलो चांदीचा भाव ६६५९७ रुपयांवर स्थिरावला. तो ६६२८६ रुपयांपर्यंत खाली आला होता.Goodreturns या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७३१० इतका खाली आला आहे तर २४ कॅरेटचा भाव ४८३१० रुपये इतका आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७४१० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५१७२० रुपये झाला आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४५३०० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९४२० रुपये आहे. त्यात ३९० रुपयांची घसरण झाली आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७७१० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०२१० रुपये आहे.

सोने सावरले ; जाणून घ्या आज सोने किती रुपयांनी महागले
जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव प्रती औंस १८१३.१५ डॉलर झाला आहे. अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे यूएस बॉण्डयिल्डमध्ये घसरण झाली आहे. आर्थिक अनिश्चितता वाढल्याने गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोन्याकडे वळाले असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कॉमेक्समध्ये सोन्याचा भाव ०.५ टक्क्यांनी वधारून १८१९ डॉलर प्रती औंस झाला. 

...................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment