Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

रत्नागिरी शहरात आणखी एक अनैतिक व्यवसाय आला उघडकीस



रत्नागिरी शहरात आणखी एक अनैतिक व्यवसाय आला उघडकीस


रत्नागिरी:-कधीकाळी सुसंस्कृतपणाचे धडे देणाऱ्या रत्नागिरीचे नाव हळूहळू अवैध कामांसाठी गाजू लागले असून शहरात गुरुवारी आणखी एका अनैतिक व्यवसायाचे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. शहरातील नाचणे आय. टी. आय. रोडवरील एका इमारतीत सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर धाड टाकून पोलिसांनीं एक महिला आणि एका पुरुषाला अटक केली असून पीडित मुलीला ताब्यात घेतले आहे. मात्र अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीतच अशा प्रकारचा दुसरा प्रकार शहरातील मध्यवस्तीत उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दि . १५/०७/२०२१ रोजी नाचणे रोडवरील आय.टी.आय. जवळील एका बिल्डींगमधील फ्लॅटमध्ये मुलींना बेकायदेशीररित्या ठेऊन, गि-हाईक आणून अनैतिक व्यवसाय चालू आहे, अशी बातमी रत्नागिरी शहर पोलीसाना मिळाली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे , रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी सदाशिव वाघमारे , शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी या ठिकाणी बोगस गि-हाईक पाठविले. यावेळी मुलींना बेकायदेशीररित्या आणून व गि-हाईक आणून , अनैतिक व्यवसाय चालू आहे, याची खात्री पोलिसांना झाली. त्यनंतर पोलीसांनी छापा टाकला, त्यावेळी तिथे एक पिडीत मुलगी व तिचेकडून वेश्या व्यवसाय करुन घेणारा इसम असे दोघेजण मिळून आले.पोलीसांनी सदर इसमाकडे चौकशी केली असता त्याचे नाव रावसाहेब जगन्नाथ माळी (वय ४२ वर्षे, रा. भेकराईनगर, बसस्टॉप शेजारी, ता. हवेली, जि. पुणे -मूळ रा. कासेगांव, ता . वाळवा , जि . सांगली ) असे त्याने सांगितले. त्याने आपल्यासोबत एका स्त्री साथीदार असून तिच्यासह स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता मुलींना बेकायदेशीररित्या आणून व गि-हाईक आणून, वेश्या व्यवसाय करीत असल्याची माहिती पोलिसांना दिली.याप्रकरणी पोलीसांनी रावसाहेब माळी व त्यची एक स्त्री साथीदार यांच्या विरुध्द शहर पोलीस ठाणे येथे रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.कलम ३७०, ३४ सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम ३ , ४ , ५ अन्वये गुन्हा करुन दाखल करुन रावसाहेब माळी यास दाखल गुन्ह्यात अटक केली आहे . तसेच पिडीत मुलीस महिला पोलीस अधिकारी व स्टाफ यांनी ताब्यात घेतले आहे . सदर कारवाई मा . पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे , रत्नागिरी, पोलीस निरीक्षक अनिल लाड, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.नि. एम.एस.भोसले , परि . म.पो.उ.नि. मेहेर , पो.हवा. जाधव , पो.ना. नार्वेकर , पो.ना. सावंत , पो.ना. सावंत , म.पो.ना. गुरव , म.पो.शि. नाटेकर , म.पो.शि.मलबारी यांनी केली.मात्र या प्रकारामुळे खळबळ उडाली असून या सुसंस्कृत शहराला नेमकी कुणाची दृष्ट लागली आहे आणि अशा व्यवसायाचे धाडस दाखवण्यासाठी नेमके कुणाचे अभय आहे असा सवाल उपस्थित होत आहे.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment