Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

खूशखबर, तब्बल तीन महिन्यांनंतर इंधन झालं स्वस्त!



 खूशखबर, तब्बल तीन महिन्यांनंतर इंधन झालं स्वस्त!


इंधन दरवाढीचा (oil price) सपाटा लावणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांना आज माणुसकीचा पाझर फुटला आहे. तब्बल तीन महिन्यांनंतर कंपन्यांनी आज सोमवारी डिझेल दरात कपात केली आहे. तर दुसऱ्या बाजुला पेट्रोलमधील दरवाढ कायम ठेवली आहे. आज डिझेल १६ पैशांनी स्वस्त झाले तर पेट्रोल २८ पैशांनी महागले आहे.कंपन्यांनी रविवारी इंधन दर स्थिर ठेवले होते. तर शनिवारी पेट्रोल ३५ पैसे आणि डिझेलमध्ये २६ पैशांची वाढ झाली होती. तीन महिन्यांनंतर डिझेलमध्ये दर कपात करण्यात आली असली तर पेट्रोलमधील महागाई कायम आहे. आज पेट्रोल दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.२० रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.१९ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.९२ रुपये इतका आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.३५ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.५३ रुपये इतका वाढला आहे. बंगळुरात पेट्रोल १०४.५८ रुपये झाले आहे.आजच्या दर कपातीने मुंबईत डिझेलचा भाव ९७.२९ रुपये  (oil price) झाला आहे. रविवारी तो ९७.४६ रुपये इतका होता. दिल्लीत डिझेल ८९.७२ रुपये झाले आहे. चेन्नईत ९४.२४ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.८१ रुपये प्रती लीटर झाला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.५० रुपये झाला आहे. बंगळुरात डिझेल ९५.०९ रुपये आहे.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment