Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

''बहोत हो गई महंगाई की मार...' या घोषवाक्याची टॅगलाईन आता कुठेच दिसत नाही'''बहोत हो गई महंगाई की मार...' या घोषवाक्याची टॅगलाईन आता कुठेच दिसत नाही'


मुंबईः 'महागाईने जुन्या सरकारच्या काळातील सर्व विक्रम मोडीत काढून नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. एरवी एखाद्या नटीच्या बेकायदा बांधकामासह कोणत्याही फुटकळ विषयावर छाती बडवत हाय तौबा माजवणारी मंडळी आता भडकलेल्या महागाईच्या ज्वलंत प्रश्नावर मात्र तोंड उघडायला तयार नाहीत,' अशा शब्दांत शिवसेनेनं (Shivsena)केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरड मोडलं आहे. त्यात लॉकडाऊनमुळं झालेलें नुकसान यामुळं जनता त्रस्त आहे. केंद्रातील विरोधी पक्ष असलेले काँग्रेस पेट्रोल- डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. शिवसेनेनंही महागाईच्या मुद्द्यावरुन भाजप सरकारला घेरलं आहे. तसंच, २०१४च्या निवडणुकीआधी भाजपनं केलेल्या प्रचाराचीही आठवण करुन दिली आहे. बहोत हो गई महंगाई की मार... या घोषवाक्याची टॅगलाईन आता कुठेच नजरेस पडत नाही, असा खोचक टोला शिवसेनेनं लगावला आहे.'पिठापासून मिठापर्यंत, चहा-साखरेपासून भाजीपाल्यापर्यंत, अन्न-धान्यापासून खाद्यतेलांपर्यंत, बियाणांपासून खतांपर्यंत आणि पेट्रोल-डिझेलपासून स्वयंपाकाच्या गॅसपर्यंत सगळ्याचेच भाव भडकले आहेत. कधी काळी याच महागाईच्या प्रश्नावर गल्लीपासून दिल्लीपर्यंत नरडी बसेपर्यंत घोषणाबाजी करणाऱ्या, कॅमेऱ्यासमोर येऊन महागाईविरोधात सरकारला जाब विचारणाऱ्या तत्कालीन आंदोलकांची आता दातखीळ बसली आहे,' अशा शब्दांत शिवसेनेनं केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.'सत्तेवर येण्यासाठी निवडणूक प्रचारात वापरलेली 'बहोत हो गई महंगाई की मार..' या घोषवाक्याची टॅगलाईन आता कुठेच नजरेस पडत नाही. याच घोषणेवर विश्वास ठेवून महागाईविरोधात लढणारा पक्ष म्हणून देशवासीयांनी भाजपला दिल्लीच्या तख्तावर बसवले. आता महागाईचे संकट कायमचे दूर होणार, खिशात पैसेच पैसे खुळखुळणार, अच्छे दिन येणार या भाबड्या समजुतीतून देशातील सर्वसामान्य, मध्यमवर्गीय, गोरगरीब जनतेने भरभरून भाजपच्या पात्रात भरघोस मतदान टाकले. केंद्रात लागोपाठ दोन वेळा भाजपचे सरकार बहुमताने निवडून दिले. मात्र, सत्तेवर येऊन सात वर्षे झाली, तरी केंद्रीय सरकारला महागाईचा राक्षस अजूनही मारता आलेला नाही. उलट महागाईचा भडका दिवसेंदिवस वाढतोच आहे. महागाईवर तर मार पडली नाही आणि गोरगरीबांच्या खिशावरचा मार मात्र वाढला,' अशी टीका शिवसेनेनं केली आहे.'देशभरात महागाईचा आगडोंब उसळला असताना मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये महागाई थोडीशी कमी झाली, असा दावा सरकारच्या ताज्या आकडेवारीत करण्यात आला आहे. त्यावर विश्वास कोण ठेवणार? महागाईचा घोडा चौखूर उधळला आहे. त्यावर मांड ठोकून लगाम ओढण्याचा कोणताही उपाय सरकार करताना दिसत नाही. छोटा उतारा म्हणून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ११ टक्क्यांनी वाढविण्याचा ताजा निर्णय सरकारने घेतला. काही लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असला, तरी महागाईच्या वणव्यात होरपळणाऱ्या कोट्यवधी गोरगरीब जनतेने कसे जगायचे, याचे उत्तर सरकारकडे आहे काय?,' असा सवाल शिवसेनेनं केला आहे.....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment