Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

मोठी बातमी! RBI ने रद्द केला महाराष्ट्रातील या बँकेचा परवाना




मोठी बातमी! RBI ने रद्द केला महाराष्ट्रातील या बँकेचा परवाना


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (rbi bank) महाराष्ट्रातील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा (Dr. Shivajirao Patil Nilangekar Urban Co-operative Bank Ltd.) बँकिंग परवाना (Canceled Banking License) रद्द केला आहे. आरबीआयने परवाना रद्द करण्याबरोबरच बँकेमध्ये रक्कम जमा करणे आणि पेमेंट करण्यावर देखील निर्बंध आणण्यात आले आहेत.


काढता येणार नाहीत पैसे

बँकेचा परवानाच रद्द झाल्याने आता बँक ठेवीदारांना पैसे देण्यास असमर्थ होईल. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड त्यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे पैसे फेडू शकत नाही. आरबीआय व्यतिरिक्त सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे कुलसचिव यांनीही महाराष्ट्रातील ही बँक बंद करून बँकेसाठी अधिकारी नेमण्याचे आदेश जारी केले आहेत.

बँकेकडे नाही आहे कमाईचं साधन

आरबीआयने (rbi bank) अशी माहिती दिली आहे की सध्या डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडकडे उत्पन्नाचं कोणतंही साधन नाही आहे. हे बँकिंग नियमन कायदा 1949 च्या तरतुदीनुसार नाही. डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. ग्राहकांसाठी सुरू राहणं योग्य नाही. बँकेला व्यवसाय वाढविण्याची परवानगी दिली तर त्याचा परिणाम ग्राहकांवर आणि सामान्य लोकांवर होईल.
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment