नागपूरातील एका नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी शिवसेना भाजप एकत्र ?
नागपूर:यामुळे आता सोशल मीडियात चर्चा रंगत आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेनं भाजपशी युती तोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाशी आघाडी सरकार स्थापन केल्यापासून भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षाकडून एकमेकांविरुद्ध चिखलफेक सुरू आहे. अनेकदा वैयक्तिक पातळीवर येऊन देखील टीका केली जात आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येणं, शक्य नसल्याची चर्चा सोशल मीडियात सुरू असते. असं असताना राज्यात एकमेकांविरुद्ध कुरघोड्या करणारे हे दोन्ही पक्ष नागपूरातील एका नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी एकत्र आले आहे. यामुळे आता सोशल मीडियात चर्चा रंगत आहेत.महाराष्ट्रात शिवसेना भाजपची पुन्हा युती होईल की नाही, हे माहीत नाही.पण तूर्तास देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरातील बुटीबोरी नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी भाजप शिवसेना एकत्र आली आहे.जुने मित्र एकत्र आल्यानं नागपूरात उलटसुलट चर्चा देखील सुरू झाली आहे. शिवसेना खासदार कृपाल तुमाने आणि भाजप आमदार समिर मेघे यांच्या प्रयत्नानं बुटीबोरी नगरपरिषदेसाठी दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत.बुटीबोरी नगरपरिषदेच्या सभापती निवडीसाठी या दोन पक्षांनी युती केली आहे. सेना आणि भाजप एकत्र आल्यानं बुटीबोरी नगरपरिषदेत भाजपचे पाच तर शिवसेनेचा एक सभापती बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच बुटीबोरीत भाजपचे बबलू गौतम यांनी नगराध्यक्ष म्हणून शहराची धुरा सांभाळली आहे. दरम्यान राज्यातही भाजप शिवसेनं एकत्र येत हेच मॉडेल राबवलं पाहिजे, अशी इच्छा देखील बबलू गौतम यांनी बोलून दाखवली आहे.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा