
अकरावीची प्रवेशप्रक्रिया आजपासून
पुणे : उच्च न्यायालयाने अकरावीच्या प्रवेशासाठीची सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) रद्द केल्यानंतर शिक्षण विभागाकडून अकरावीची प्रवेशप्रक्रिया आज, शनिवारपासून (१४ ऑगस्ट) सुरू होणार आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर राज्य शासनाने अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेतला. ऑफलाइन पद्धतीने होणारी ही सीईटी विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक होती. मात्र या सीईटीला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने मंगळवारी याप्रकरणी निर्णय घेत सीईटी रद्द करून अकरावीची प्रवेशप्रक्रिया तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी अकरावीच्या प्रवेशाबाबतचे परिपत्रक आणि प्रवेशप्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. राज्य मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या अंतर्गत निकालात विद्यार्थ्यांना भरभरून गुण मिळाले असल्याने यंदाच्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत विशेष चुरस होणार आहे. नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशांसाठी दरवर्षी आवश्यक असणारे पात्रता गुण (कटऑफ) यंदा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पहिली नियमित फेरी
१४ ते २२ ऑगस्ट – विद्यार्थ्यांनी नोंदणी, प्रवेश अर्जाचा भाग एक भरणे, अर्ज पडताळणी, संस्थास्तरावरील राखीव जागांवरील प्रवेशासाठी अर्ज करणे१७ ते २२ ऑगस्ट – प्रवेश अर्जाचा भाग दोन भरणे, प्राधान्यक्रम नोंदवणे, महाविद्यालयांनी व्यवस्थापन आणि अंतर्गत राखीव जागा प्रत्यार्पित करणे
२३ ते २५ ऑगस्ट – तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे, गुणवत्ता यादीवरील आक्षेप नोंदवणे, गुणवत्ता यादी अंतिम करणे
२५ ते २६ ऑगस्ट – विदा प्रक्रियेसाठी राखीव
२७ ऑगस्ट – प्रवेश फे रीसाठी कनिष्ठ महाविद्यालयांतील रिक्त जागा संके तस्थळावर जाहीर करणे, पात्रता गुण जाहीर करणे, प्रवेश जाहीर करणे (अॅलॉटमेंट)
२७ ते ३० ऑगस्ट – विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी प्रक्रिया करणे, कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेश निश्चित करणे, प्रवेश निश्चित करणे, प्रवेश नाकारणे, प्रवेश रद्द करणे
कुठे आणि कशी?
मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, अमरावती या महापालिका क्षेत्रातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने, तर उर्वरित राज्यात महाविद्यालय स्तरावर प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल. चार फेऱ्या… केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिली नियमित फे री १४ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान राबवली जाईल. तर दुसरी नियमित फे री ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर, तिसरी नियमित फे री ५ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर आणि विशेष प्रवेश फे री १२ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान राबवली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेची माहिती 11thadmission.org.in या संके तस्थळावर देण्यात आली आहे.
पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयातच…
विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाच्या भाग दोनमध्ये महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवायचे आहेत. त्या पसंतीक्रमापैकी पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश जाहीर झाल्यास विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य आहे. पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश जाहीर होऊनही प्रवेश न घेतल्यास संबंधित विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर जाईल आणि त्याला पुढील विशेष फे रीद्वारे प्रवेश दिला जाईल.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा