
परीक्षा देण्यासाठी पोहोचले
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला बुधवारी दहावीची परीक्षा देण्यासाठी पोहोचले होते. दहावीच्या इंग्रजी विषयाची परीक्षा देण्यासाठी ओमप्रकाश चौटाला परीक्षा केंद्रावर दाखल झाले होते. सिरसा येथील आर्य कन्या वरिष्ठ माध्यमिक शाळेत त्यांनी इंग्रजीचा पेपर दिला.
ओमप्रकाश चौटाला यांनी गतवर्षी हरियाणा ओपन बोर्डाकडून बारावीची परीक्षा दिली होती. पण त्यांनी दहावीची इंग्रजीची परीक्षा उत्तीर्ण केली नसल्याने ५ ऑगस्टला निकाल राखीव ठेवण्यात आला होता. आपला बारावीचा निकाल मिळवण्यासाठीच चौटाला दहावीच्या परीक्षेसाठी पोहोचले होते.
परीक्षा केंद्रावर पोहोचले असताना तेथे उपस्थित प्रसारमाध्यांना, “मी विद्यार्थी आहे, नो कमेंट्स” म्हणत काही बोलणं टाळलं. यावेळी त्यांनी कोणतंही राजकीय भाष्य टाळलं. यानंतर ८६ वर्षीय ओमप्रकाश चौटाला परीक्षा देण्यासाठी गेले.
दरम्यान याआधी चौटाला यांनी शिक्षण विभागाकडे पेपर लिहिण्यासाठी लेखकाची मागणी केली होती. त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली होती. दोन तासात चौटाला यांनी पेपर पूर्ण केला.
जेबीटी घोटाळ्याची शिक्षा भोग असताना २०१३ ते २०२१ दरम्यान चौटाला यांनी तिहार जेलमध्ये दहावीच्या परीक्षेचा अभ्यास केला होता. २०१७ मध्ये त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलमधून उर्दू, सायन्स, सोशल स्टडीज आणि इंडियन कल्चर अॅण्ड हेरिटेज विषयांमध्ये ५३,४ टक्के गुण मिळवले होते.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा