Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

दहशतवाद विरोधी पथकाकडून रत्नागिरीत दोघांना अटक


Anti-terror squad arrests two in Ratnagiri
Advertisement

दहशतवाद विरोधी पथकाकडून रत्नागिरीत दोघांना अटक

रत्नागिरी: बेकायदेशीररित्या इंटरनॅशनल कॉलिंग सेंटर चालवत असल्याच्या संशयावरून शहरातील मोबाईल शॉपी मालकासह पनवेल येथील मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी गजाआड केले आहे. मुंबईतील दहशतवादविरोधी पथकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. देशविरोधी कारवायांसाठी हे इंटरनॅशनल कॉलिंग सेंटर सुरू होते का, या दृष्टीने तपास केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतून इंटरनॅशनल कॉल होतात, अशी माहिती मुंबई एटीएसला मिळाली होती. ही माहिती रत्नागिरी पोलिसांना देण्यात आली. यानंतर रत्नागिरी आठवडा बाजार येथील मोबाईल दुकानात पोलिसांनी धाड टाकली. इंटरनॅशनल कॉलिंग सेंटर चालविण्यासाठी आठवडा बाजार येथील श्रीटेक दुकानाचे मालक अलंकार अरविंद विचारे यांच्या दुकानात कॉलिंगचा सर्व्हर बसवण्यात आला होता. या सर्व्हरवरूनच इंटरनॅशनल कॉलिंग सुरू होेते. यासाठी एका कंपनीचे कनेक्शन घेण्यात आले होते. मुंबई एटीएसने माहिती काढलेल्या या इंटरनॅशनल कॉलिंगसाठी सर्व्हर रत्नागिरीत आणि कॉलिंग सेंटर वांद्रेमधील एका इमारतीत सुरू होते. वाईप द्वारे हे इंटरनॅशनल कॉलिंग सुरू होते. दहशतवादी कारवाया करण्यासाठी नेहमी ही पद्धत वापरली जाते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रत्नागिरीतून इंटरनॅशनल कॉलिंगसाठी बसवण्यात आलेल्या सर्व्हरसह दुकानमालक अलंकार अरविंद विचारे (रा. छत्रपतीनगर रत्नागिरी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणातील मास्टर माईंड ओळखला जाणारा फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी (रा. पनवेल, नवी मुंबई) हा रत्नागिरीत येत असल्याची माहिती रत्नागिरी एटीसीला मिळाली होती. या माहितीवरुन साळवी स्टॉप येथे सापळा रचण्यात आला होता. पोलिसांनी फैसल याला मोठ्या शिताफीने साळवी स्टॉप येथे ताब्यात घेतले. अलंकार विचारे व फैसल सिद्दीकी या दोघांविरोधात शहर पोलीस स्थानकात कलम ४२०, ३४, आयटी अॅक्ट ४३ (ह), ६६ (ड), इंडियन टेलिग्राफीक अॅक्ट ४, २०, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल लाड करीत आहेत.

.....................................
------------------------------

www.freshnewz.inShare on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment