Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

कृषि विद्यापीठाच्या सुवर्णजयंती वर्षा निमित्त विनामुल्य ऑनलाईन पध्दतीने परिसंवाद


 
कृषि विद्यापीठाच्या सुवर्णजयंती वर्षा निमित्त विनामुल्य ऑनलाईन पध्दतीने परिसंवाद 

रत्नागिरी: निमखाऱ्या पाण्यातील मासे व कोळंबी संवर्धन " यांची दोन दिवशीय विनामुल्य ऑनलाईन पध्दतीने परिसंवाद दि . २४ व २५ ऑगस्ट २०२१ डॉ . बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या सुवर्णजयंती वर्षा निमित्त सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र , झाडगाव , रत्नागिरी यांनी “ निमखाऱ्या पाण्यातील मासे व कोळंबी संवर्धन यांची दोन दिवसीय विनामुल्य ऑनलाईन पध्दतीने परिसंवाद दि . २४ व २५ ऑगस्ट २०२१ आयोजीत केला . हा परिसंवाद आयोजन करण्यासाठी विद्यापीठाचे सन्माननिय कुलगुरू डॉ . संजय सावंत , विस्तार शिक्षण सचालक डॉ . संजय भावे , संशोधन संचालक डॉ . पराग हळदणकर , शिक्षण संचालक डॉ . सतिश नारखेडे व विद्यापीठाचे कुलसचिव , डॉ . भरत साळवी व संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ . प्रकाश शिनगारे यांचे मार्गदर्शन लाभले . सद्याच्या वातावरणातील होणाऱ्या बदलाचा विचार करून बदलत्या वातावरणातही अनुकूल अशा मत्स्य व कोळंबी संवर्धनाबाबत या परिसंवाद मुख्यत्वे भर देण्यात आला होता . ऑनलाईन परीसंवादाची समन्वयक म्हणून डॉ . आसिफ पागरकर यांनी केले . सदर प्रशिक्षणास १८५ ऐवढया लोकांनी नोंदणी केली . जिल्हा व जिल्हया बाहेरील तसेच राज्याबाहेरील एवढेच नव्हेतर देशाबाहेरील इच्छुकांनी नोंदणी केली . या ऑनलाईन परिसंवादामध्ये पहिल्या दिवशी दिनांक २४ ऑगस्ट , २०२१ रोजी डॉ . प्रकाश शिनगारे यांनी निमखाऱ्या पाण्यातील मत्स्य व कोळंबी संवर्धनाची सद्यस्थिती व वाव या विषयावर व्याख्यान दिले . श्री . कल्पेश शिंदे यांनी प्रकल्पासाठी जागेची निवड व तलावाचे बांधकाम या विषयावर तर डॉ . आसिफ पागरकर यांनी निमखाऱ्या पाण्यातील व्हेनामी कोळंबीचे संवर्धन या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्याने दिली . परिसंवादाच्या दुसऱ्या दिवशी दिनांक २५ ऑगस्ट , २०२१ या रोजी श्री . सचिन साटम यांनी निमखाऱ्या पाण्यातील जिताडा माशांचे संवर्धन , डॉ . संतोष मेतर यांनी निमखाऱ्या पाण्यातील काळूदर माशांचे संवर्धन व श्री . नरेंद्र चोगले यांनी बायोफ्लॉक या तंत्रज्ञान बाबत माहीती दिली . तसेच मत्स्यव्यवसाय विभागाच्या सौ . उत्कर्षा किर सहा , मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी यांनी मत्स्य व्यवसाय विभागाच्या विविध अनुदान योजना बाबत माहीती दिली . या परीसंवादामध्ये हजर असलेल्या प्रशिक्षणार्थीनी पैकी श्री . रामचंद्र सारंग यांनी प्रशिक्षण उत्तमरित्या आयोजीत केल्या बदद्ल केंद्राचे आभार मानून नेहमीच संवर्धकांना मार्गदर्शन करत असल्याबाबत केंद्राची व विद्यापीठा बाबत कृतज्ञता व्यक्त केली . तसेच कालूंदर , जिताडा , व्हर्टीकल खेकडा पालन बदद्ल आपले अनुभव कथन करून या संवर्धनामुळे मत्स्य शेतकऱ्यांचे जीवनमान नक्कीच उंचावेल अशी प्रतिकीया दिली. 

त्याचप्रमाने नाशिक मधील श्री . रवींद्र साळुखे यांनी या प्रकारचे प्रशिक्षण आयोजीत केल्याबद्दल केंदाचे आभार मानून आपले मत्स्य संवर्धना बाबतचे अनूभव सर्वान सोबत कथन केले . सांगलीचे श्री . संदिप रूपनूर मुख्य कार्यकारी अधिकारी , सांगली जिल्हा मत्स्य संवर्धन उत्पादक कंपनी यांनी बायोफ्लॉक तंत्रज्ञान बाबत आपले अनुभव सर्वांना विषद केले . मुंबई मधील श्री . डिकोस्टा यांनी त्यांच्या अनुभवानुसार निमखारे पाणी मत्स्यशेतीवरील सदरचा कार्यक्रम उत्तम आयोजीत केल्या बदद्ल कौतुक केले . या कार्यक्रमामध्ये उदघाट्न व निरोप समारंभामध्ये वेळ न घालवता सरळ तांत्रिक सत्र सूरू केल्याबाबत प्रशिक्षणार्थीनी केंद्राचे आभार मानले व अशा प्रकारचे कार्यक्रम घेतल्यास महाराष्ट्राच्या आर्थिक विकास होण्यात मदत होईल . असे मत व्यक्त केले . सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ . आसिफ पागरकर तर आभार प्रदर्शन डॉ . प्रकाश शिनगारे यांनी केले . कार्यक्रम यशस्वी आयोजनासाठी डॉ . केतन चौधरी , डॉ . आसिफ पागरकर , डॉ . संतोष मेतर, नरेंद्र चोगले, सचिन साटम, कल्पेश शिंदे इतर सर्व कर्मचारी आणि मजूर यांनी विशेष परिश्रम घेतले.

.................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा