Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

औद्योगिक उत्पादनात १३.६ टक्के वाढ; महागाई दरात नरमाईचा दिलासा!


औद्योगिक उत्पादनात १३.६ टक्के वाढ; महागाई दरात नरमाईचा दिलासा!

औद्योगिक उत्पादनात १३.६ टक्के वाढ; महागाई दरात नरमाईचा दिलासा!

नवी दिल्ली : निर्मिती क्षेत्र, खाणकाम व ऊर्जा क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीच्या परिणामी सरलेल्या जूनमध्ये देशातील औद्योगिक उत्पादनाने १३.६ टक्क्य़ांच्या वाढीची मुसंडी घेतली आहे. मागील वर्षांत रसातळाला गेलेल्या प्रमाणाच्या तुलनेत ही मोठी वाढ दिसत असली, तरी एकूण अर्थचक्र हे हळूहळू करोनाच्या साथीच्या फासातून मोकळे होत असल्याचे हे द्योतक आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) गुरुवारी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, जून २०२१ मध्ये देशाचे निर्मिती क्षेत्र हे १३ टक्के वृद्धीदराने प्रगतिपथावर होते, औद्योगिक उत्पादन निर्देशांकामध्ये निर्मिती क्षेत्राचे ७७.६३ टक्के योगदान असल्याने, या निर्देशांकांच्या दमदार सुधारलेल्या पातळीसाठी निर्मिती क्षेत्राची ही कामगिरीच महत्त्वपूर्ण ठरली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यातून सावरत, कारखानदारी आणि उत्पादन क्षमता पुन्हा रुळावर येत असल्याचे हे द्योतक मानले जात आहे.

गेल्या वर्षांतील असमान्य परिस्थितीच्या तुलनेत, यंदाच्या आकडेवारीची तुलना करणे समर्पक ठरणार नाही. मात्र करोना प्रतिबंधासाठी घातलेल्या र्निबधांमध्ये हळूहळू शिथिलता आल्याने, आर्थिक उपक्रमांमध्ये सुधार होत आहे आणि त्याचे सापेक्ष प्रतिबिंब हे संबंधित आकडेवारीत उमटत आहे, असे निश्चितच म्हणता येईल, असे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने प्रसिद्धीस हिलेल्या  निवेदनात म्हटले आहे.

निर्मिती क्षेत्राबरोबरीनेच खाणकाम क्षेत्राने २३.१ टक्क्य़ांचा वृद्धीदर नोंदविला, तर जूनमध्ये वीजनिर्मिती क्षेत्राने ८.३ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. जून २०२१ मध्ये १३.६ टक्के वाढीसह औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने १२२.६ अंशांची पातळी गाठली, जी करोना-पूर्व काळाच्या म्हणजे जून २०१९ मधील या निर्देशांकाच्या १२९.३ अंश या पातळीपेक्षा फार दूर नाही, हे स्पष्ट होते. जून २०२० मध्ये मात्र या निर्देशांकाचा स्तर १०७.९ अंश असा घरंगळला होता. करोना पहिल्या लाटेत देशव्यापी टाळेबंदीच्या त्या महिन्यात हा निर्देशांक १६.६ टक्क्य़ांनी आक्रसला होता.

गेल्या वर्षी मार्चमध्ये करोनाच्या उद्रेकापश्चात, पहिल्या महिन्यापासून औद्योगिक उत्पादन १८.७ टक्क्य़ांनी आकसण्यास सुरुवात झाली आणि हा क्रम ऑगस्ट २०२० पर्यंत सुरूच होता. सप्टेंबर २०२० मध्ये टाळेबंदीतील आंशिक शिथिलतेसह, औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने पहिल्यांदाच सकारात्मक कल दर्शवत, ४.५ टक्क्य़ांची वाढ नोंदवली. नोव्हेंबरमध्ये पुन्हा नकारात्मकतेनंतर, डिसेंबर २०२० मध्ये हा निर्देशांक सकारात्मक राहिला.

चालू २०२१ वर्षांत मार्चमध्ये २४.२ टक्क्यांची झेप घेतल्यानंतर, ‘एनएसओ’ने एप्रिलमध्ये औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी जाहीर करण्याचे टाळले. मे २०२१ मध्ये हा निर्देशांक २८.६ टक्के दराने वधारला होता. करोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान देशात एप्रिलच्या मध्यापासून सुरू झाले आणि त्या पश्चात अनेक राज्यांमध्ये स्थानिक स्तरावरील रुग्ण-स्थितीनुरूप टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला होता.

जुलैमध्ये महागाई दर ५.५९ टक्क्य़ांवर

नवी दिल्ली : किरकोळ किमतींवर आधारित महागाई दराने, गेल्या काही महिन्यांतील चढत्या क्रमापासून फारकत घेऊन दिलासा दिला आहे. मुख्यत: अन्नधान्य किमतीतील घसरणीने सरलेल्या जुलैमधील महागाईचा दर ५.५९ टक्क्य़ांवर नरमल्याचे गुरुवारी जाहीर झालेल्या आकडेवारीने स्पष्ट केले.

.....................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment