Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

सिरमचे सायरस पूनावाला म्हणतात, “पुण्याला सर्वाधिक लस देण्यास आम्ही तयार पण मोदी सरकारने…”


cyrus poonawalla and Modi

Advertisement

सिरमचे सायरस पूनावाला म्हणतात, “पुण्याला सर्वाधिक लस देण्यास आम्ही तयार पण मोदी सरकारने…

”करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन मुख्य शहरांचा आणि जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्याचे अर्थचक्र फिरवणाऱ्या या दोन महत्वाच्या शहरांमध्ये सर्वाधिक करोना रुग्ण आढळून आलेले. पुण्यामधील रुग्णसंख्या तर मुंबईपेक्षाही जास्त असल्याचं चित्र मध्यंतरी निर्माण झालं होतं. याच पार्श्वभूमीवर पुण्यातीलच सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये तयार होणाऱ्या कोव्हिशिल्ड लसी आधी पुण्यात द्याव्यात अशी मागणी करण्यात आली. मात्र त्यावर काही ठोस निर्णय झाला नाही. तरी यासंदर्भातील एक मोठा खुलासा आता सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी केला आहे. पुण्यामध्ये सर्वाधिक करोना रुग्ण असल्याचं अहवालामधून दिसून आल्यानंतर आम्ही पुण्याला सर्वाधिक लसींचा पुरवठा करण्याबद्दल विचारणार केली होती. मात्र केंद्रातील मोदी सरकारने त्यावर काहीच उत्तर दिलं नसल्याचं सायरस पूनावाला म्हणाले आहेत.राज्यामध्ये अनलॉकदरम्यान पुण्यामधील निर्बंध शिथिल न करण्यात आल्याने मागील आठवड्यामध्ये मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पुण्यामध्येही निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली. मात्र पुण्यातील रुग्णसंख्येचा विचार करुन आधी सूट देण्यात आली नसल्याचं दिलासा दिला नसल्याचं सांगण्यात आलेलं. यावरुनचा वाद शांत होत असतानाच आता सायरस पूनावाला यांनी मोदी सरकारनेच पुण्याला प्राधान्य क्रमाने लसींचा पुरवठा करण्यासंदर्भात काहीच उत्तर न दिल्याचं म्हटलं आहे.राज्य सरकारने करोना लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केलेले असतानाच पूनावाला यांनीही आता पुन्हा पुन्हा लॉकडाउन नको अशी भूमिका मांडली आहे. पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना पूनावाला यांनी लॉकडाउन हा जास्त नागरिकांचा मृत्यू होत असेल अशा संकाटाच्या कालावधीमध्येच लावावा असं मत व्यक्त केलं आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पारितोषिक यंदा कोविशिल्ड ही करोनाची लस बनवणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांना प्रदान करण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार पूनावाला यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पूनावाला बोलत होते.पूर्वी कोणत्याही परवानग्या मिळविताना नोकरशाहचा खूप जाच व्हायचा आता कमी झाला असून याचं श्रेय मोदी सरकारला आहे, असंही पूनावाला यांनी म्हटलं आहे. सिरमचा आजवरचा प्रवास खूप परिश्रमाचा आणि वेदनादायी राहिला आहे. मात्र आता पतिस्थिती बदलली आहे. करोनावरील लस बनवण्यासाठी आम्हाला सर्व प्रकारच्या परवानग्या तात्काळ मिळल्या. त्याचप्रमाणे सरकारकडून प्रोत्साहन देखील मिळाले आहे. कोविशिल्ड ही जगातील सर्वात स्वस्त लस आहे. अतिशय माफक दरात आम्ही ही लस देत आहोत, असंही यावेळी पूनावाला यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही अनेक लशी एका चहाच्या कपाच्या इतक्या नाममात्र किमतीत दिल्या आहेत, असंही पूनावाला यांनी म्हटलंय.आत्तापर्यंत देशाविदेशात अनेक पुरस्कार मिळाले. पण लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार विशेष आहे. टिळकांचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठं योगदान आत्तापर्यंत ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांच्या तुलनेत मी काही नाही. आजवरचा प्रवास खूप वेदनादायी होता. आता तो कौतुकास्पद ठरला असून दिवंगत प्रिय पत्नी विलू यांना पुरस्कार अर्पण करतो, अशा शब्दांमध्ये पूनावाला यांनी या पुरस्काराबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या

.....................................
------------------------------

www.freshnewz.in


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment