Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

राज्याची उपराजधानी हादरली, अल्पवयीन मुलीवर गँगरेप

 




राज्याची उपराजधानी हादरली, अल्पवयीन मुलीवर गँगरेप


महाराष्ट्राच्या  उपराजधानीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय. नागपुरात  केवळ साडे तीन तासात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका 16 वर्षांच्या मुलीवर  गँगरेप  झाला आहे.धक्कादायक म्हणजेच या गँगरेपमध्ये जवळपास सहा नराधमांनी तिच्यावर बलात्कार केल्याचं समजतंय. घरच्यासोबत क्षुल्लक वाद झाल्यानं पीडित मुलगी घर सोडून गेली. त्यानंतर ही घटना घडली आहे. या गँगरेप प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. या घटनेनं उपराजधानी चांगलीच हादरली आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचा तिच्या कुटुंबियांशी क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. ज्यानंतर ती घर सोडून गेली. त्यानंतर तिनं सिव्हिल लाईन्सला जाण्यासाठी रिक्षा पकडली. पण चालकाला समजलं की, तिच्याकडे पैसे नाहीत. पैसे नसल्यानं त्यानं तिला रिक्षातून खाली उतरण्यास सांगितलं.त्याच दरम्यान पीडितीनं मदतीसाठी मोहम्मद तौसीफ (26) आणि मोहम्मद शाहनवाज उर्फ सना (25) या दोन रिक्षाचालकांशी संपर्क साधला. मात्र या दोन्ही नराधमांनी रात्रीचा अंधाराचा फायदा घेत तिला मोमीनपुरा भागातील टिमकी परिसरात एका खोलीत नेलं. त्या ठिकाणी तिच्यावर चार जणांनी तिच्यावर बलात्कार केला. त्या नंतर तिला रिक्षानं मेयो रुग्णालय परिसरातील मेट्रो ब्रिज जवळ सोडलं.आरोपी तौसिफ आणि सना यांनी मुलीला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाजवळ  रिक्षाचालक मोहम्मद मुशीर (23) आणि आणखी एका व्यक्तीच्या स्वाधीन केले. तिथे मोहम्मद मुशीर आणि इतर व्यक्तीनं मुलीवर रिक्षामध्ये बलात्कार  केला आणि नंतर घटनास्थळावरून पळून गेले.त्याच दरम्यान रेल्वे पोलिसांच्या पथकाला ही पीडित मुलगी नागपूर रेल्वे स्थानकावर दिसली. त्यावर पोलिसांना संशय आल्यानं जीआरपी कर्मचारी मुलीजवळ गेले. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला एका NGOच्या ताब्यात दिले. पीडितीला आश्रयगृहात हलवण्यात आले, जिथे तिने तिच्यावर गँगरेप झाल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सना, तौसीफ, मुशीर आणि मोहम्मद नौशाद यांना संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली.

--------------------
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment