लांजा निराधार,निराश्रीत अशा दुर्लक्षित घटाकांकरीता ‘आजी-आजोबाचा गाव’
रत्नागिरी: वृद्धत्व म्हणजे जणू दुसरे बालपणच.......... ते सुखाचे आणि समाधानाचे व्हावे. आयुष्याची संध्याकाळ रमणीय व्हावी या सदहेतूने भाकर सेवा संस्था, लांजा निराधार,निराश्रीत अशा दुर्लक्षित घटाकांकरीता ‘आजी-आजोबाचा गाव’ सुरू करत आहे. वयोवृद्ध नागरिकांचे उर्वरित जीवन आनंददायक व्हावे या सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतुन दि. 21/08/2021 रोजी उद्घाटन करून आजी आजोबांच्या गावाचे लोकार्पण आहे.
विशेष म्हणजे आजी- आजोबांचा गाव या संकल्पनेसहितच डे-केअर सेंटर ही संकल्पना सुद्धा राबवित आहोत. डे-केअर सेंटर साठी इच्छुक आजी- आजोबा हे दिवसभराकरीता या सेंटरच्या सेवेचा लाभ घेऊ शकतील. जेणेकरून दिवसभरात त्यांना समवयस्कर व समविचारी मंडळींच्या सानिध्यात संपूर्ण दिवसाचा सदुपयोग व्हावा. त्यांचा दैनंदिन वेळ, दिनचर्या आदर्श पद्धतिने सुरु रहावी याकरीता या डे-केअर सेंटरचा सदुपयोग होईल.
उदघाटक- युयूस्तु आर्ते- सामाजिक कार्यकर्ते
संस्थापक- देवेंद्र जयवंत पाटील
वेळ - सकाळी 11.00
पत्ता - भाकर सेवा संस्था, संचलित आजी आजोबांचा गाव,कोंड्ये,लांजा संपर्क नंबर- 9970381195,7507795321
तरी या वृधाश्रम लोकार्पण सोहळयास आपण सर्वानी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा