Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

निकाल जाहीर करा, अन्यथा…; मुंबई विद्यापीठाला ई-मेल पाठवत बॉम्बने उडवून देण्याची धमकी


mumbai-univercity

निकाल जाहीर करा, अन्यथा…; मुंबई विद्यापीठाला ई-मेल पाठवत बॉम्बने उडवून देण्याची धमकी

 मुंबई:पदवीपूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची मागणी करणारे अनेक ई-मेल मुंबई विद्यापीठाला प्राप्त झाले आहेत. विद्यापीठाने लवकरात लवकर निकाल जाहीर केले नाहीत, तर विद्यापीठ बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देण्यात आल्याचंही विद्यापीठाकडून सांगण्यात आलंय. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन संचालकांच्या मते, त्यांना बॅचलर ऑफ आर्ट्स (बीए), बॅचलर ऑफ सायन्स (बीएससी) आणि बॅचलर ऑफ कॉमर्स (बीकॉम) च्या परीक्षेचे निकाल जाहीर करण्यास सांगणारे बॉम्ब धमकीचे ई-मेल प्राप्त झाले आहेत. याप्रकरणी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ज्या सिस्टमवरून हे ई-मेल पाठवण्यात आले, त्याचा आयपी एड्रेस शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. दरम्यान, मुंबई विद्यापीठाने जुलै महिन्यात बीकॉम आणि बीएससीच्या अंतिम वर्षाच्या सेमिस्टरचे निकाल जाहीर केले. करोनामुळे परीक्षा घेण्यास आणि निकाल जाहीर करण्यास विद्यापीठाला तुलनेने बराच वेळ लागला होता.

.....................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment