Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

घुसखोरांवर कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’चा आधार


घुसखोरांवर कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’चा आधार

घुसखोरांवर कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’चा आधार

लोकल डब्यातील अपंगांकडून माहिती मिळताच कारवाई; मध्य रेल्वेवर सात महिन्यांत २६२ घुसखोरांची धरपकड

मुंबई: लोकलमधील अपंगांच्या डब्यातून प्रवास करण्यास अन्य प्रवाशांना मनाई आहे. मात्र काही प्रवासी या डब्यात घुसखोरी करीत असल्याचे निदर्शनास आले असून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी मध्य रेल्वे सुरक्षा दलाने व्हॉट्सअ‍ॅपचा आधार घेतला आहे. अपंग प्रवासी आणि रेल्वे सुरक्षा दल कर्मचाऱ्यांचा एक व्हॉट्सअ‍ॅप गट तयार करण्यात आला आहे. या गटाच्या माध्यमातून जानेवारी ते जुलै २०२१ या काळात अपंगांच्या डब्यात घुसखोरी करणाऱ्या २६२ सामान्य प्रवाशांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

लोकलमध्ये अपंगांसाठीच्या डब्यात अन्य प्रवासी प्रवास करत असल्याने त्यांच्यासोबत वादाचे प्रसंग घडतात. यातून मार्ग काढण्यासाठी अपंग प्रवासी आणि मध्य रेल्वे सुरक्षा दल कर्मचाऱ्यांचा व्हॉट्सअ‍ॅप गट तयार करण्यात आला आहे. अपंगांच्या डब्यात घुसखोरी करणाऱ्यांचे छायाचित्र, स्थानकाचे नाव इत्यादी माहिती या गटावर पाठवल्यावर रेल्वे सुरक्षा कर्मचारी संबंधित स्थानकातील सुरक्षा दल कर्मचाऱ्यांशी संपर्क साधतात आणि कारवाईला वेग येतो. संबंधित प्रवाशावर दंडात्मक कारवाईही के ली जाते. या व्हॉट्सअ‍ॅप गटात २०४ अपंग प्रवासी सदस्य आहेत. हा गट २०२० मध्ये तयार करण्यात आला. परंतु करोनामुळे लोकल बंद, तसेच अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्याची परवानगी इत्यादींमुळे त्याद्वारे कारवाई थंडावली होती. परंतु हळूहळू वाढत गेलेली प्रवासी संख्या आणि येणाऱ्या समस्यांमुळे पुन्हा जानेवारी २०२१ पासून कारवाईला वेग आला.

गेल्या सात महिन्यांत २६२ घुसखोर प्रवाशांविरोधात कारवाई करण्यात येत असून त्यांच्याकडून सुमारे ४८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. घाटकोपर, कुर्ला, दादर, मुलुंड, डोंबिवली स्थानकात विशेष मोहीम घेण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांनी दिली.

महिला प्रवाशांचाही व्हॉट्सअ‍ॅप गट

मध्य रेल्वे सुरक्षा दलाने लोकलमधून नियमितपणे प्रवास करणाऱ्या, तसेच प्रवासी संघटनेत व सामाजिक कार्यात सहभागी असणाऱ्या महिला प्रवाशांचाही २२ डिसेंबर २०२० रोजी ‘स्मार्ट सहेली’ नावाने व्हॉट्सअ‍ॅप गट तयार के ला होता. या गटात सात हजार ८०१ महिला प्रवासी सदस्य आहेत. हा गट स्थापन केल्यानंतर सुरुवातीला करोनामुळे कारवाई काहीशी थंडावली होती. आता त्याला वेग आला आहे. गेल्या सात महिन्यांत लोकलमधील महिलांच्या राखीव डब्यात घुसखोरी करणाऱ्या २१४ पुरुष प्रवाशांवर कारवाई करून ८० हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

.....................................
------------------------------

www.freshnewz.in


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment