Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

आजची भावलेली कविता - माणुसकी

 आजची भावलेली कविता

माणुसकी...…माणुसकीने पछाडलेला एक
होता  माणूस मनाने श्रीमंत ।
रिते होते सदन त्यांचे पण
मनातून तोच खरा भगवंत ।।

एके दिवशी शेतात जाता
उपाशी दिसला छोटा स्वान ।
मनसोक्त जेवण भरवून त्याने
वाचवले तेव्हा त्याचे प्राण ।।

माणूस होता दयावान फार
स्वानाला घेतले खिशात टाकून ।
घरी नेऊन केली त्याची शुश्रूषा
बायकोचे रोजचे बोलणे ऐकून ।।

असंच वाढत गेलं त्यांचं प्रेम
बंटी नाव त्या स्वानाला पडले ।
एका भाकरीत ते दोघेही खायचे
कसे घट्ट नाते हे त्यांचे जुळले ।।

माणूस होता जरा व्यसनी म्हणून
बायको आणि मुलं बोलायचे त्याला ।
बंटी मात्र त्याच्या सोबत असायचा
विसरून साऱ्या ऐशोरामाला ।।

जवळच्या नात्यांनी सोडली साथ
केले आपलेसे मुक्या प्राण्याने ।
बाहेर फेकला गेला तो माणूस जेव्हा
जगविले त्याला त्याच्या स्वानाने ।।

लक्षात ठेवा नेहमी एक गोष्ट
मुकी जनावरे ऋण फेडतात ।
ज्यांनी केली दया त्यांच्यावर
त्यांच्यासाठी ते हसत मरतात ।।


शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी
ता.दारव्हा, जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा